शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

आयुक्तांनी केले महापालिकेत मोठे प्रशासकीय उलटफेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:48 IST

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रशासकीय रचनेत बुधवारी मोठे फेरबदल केले.

ठळक मुद्देमहापालिकेचे कामकाज गतीने व्हावे यासाठी त्यांनी सर्वच छोट्या-मोठ्या विभागांची कार्यपद्धती बदलली.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रशासकीय रचनेत बुधवारी मोठे फेरबदल केले. महापालिकेचे कामकाज गतीने व्हावे यासाठी त्यांनी सर्वच छोट्या-मोठ्या विभागांची कार्यपद्धती बदलली. आयुक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. काही अधिकाऱ्यांचे पंख छाटण्याचे कामही त्यांनी केले. मागील काही वर्षांपासून प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवीत त्यांना बळही देण्याचे काम केले. या फेरबदलाचे मनपातील राजकीय वर्तुळात स्वागत करण्यात आले. आयुक्तांना काम करण्यास १०० टक्के सूट आहे. त्यांनी आम्हाला फक्त रिझल्ट द्यावेत, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी वर्तविली.

मनपा आयुक्त डॉ. विनायक यांना रुजू होऊन दोन आठवडेच झाले आहेत. त्यांनी अत्यंत कमी वेळेत शहर आणि महापालिकेचा अभ्यास करून निर्णय घेण्यासही सुरुवात केली. मंगळवारी आयुक्तांनी महापौरांना विश्वासात घेऊन मोठे फेरबदल करणार असल्याचे सांगितले. महापौरांनीही त्यांना पूर्णपणे सूट असल्याचे सांगितले. आयुक्तांना निर्णय घेण्यास पूर्णपणे मोकळीक असली तरी त्यांनी रिझल्ट द्यावेत, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

आयुक्तांच्या अधिपत्याखालील विभाग- घनकचरा, स्वच्छ भारत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, १५० कोटींतील रस्त्यांची कामे, नगररचना, मालमत्ता विभाग आदी ३० विभाग स्वत:कडे ठेवले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनाही केले सक्षममागील अनेक वर्षांपासून अतिरिक्त आयुक्तांना अधिकारच देण्यात आले नव्हते. श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे कामगार, भांडार, बांधकाममधील रस्ते, ड्रेनेज, इमारती, विद्युत, अतिक्रमण, अग्निशमन, आस्थापना विभाग, यांत्रिकी, अभिलेख विभाग, जनगणना विभागाची जबाबादारी देण्यात आली. नऊ वॉर्डांमधील तांत्रिक कामे शहर अभियंता पाहतील. विद्युत विभागाचे प्रमुख म्हणून उपअभियंता शेख खमर यांची नेमणूक केली. आस्थापना अधिकारी जक्कल यांची यापूर्वीच भांडार विभागात बदली केली आहे.

इतर विभाग

- ड्रेनेज योजनेत अफसर सिद्दीकी यांची परत एकदा प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून निवड केली. डी.पी. कुलकर्णी यांना मालमत्ता विभागाचे प्रमुख नेमण्यात आले. 

- उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडील महसूल विभागाचा पदभार काढून त्यांना प्रशासन, एनयूएलएम आदी विभाग देण्यात आले. 

- उपायुक्त वसंत निकम यांना सक्षक्त करण्यात आले. त्यांना ई-गव्हर्नन्स, क्रीडा विभाग, उद्यान, पशुसंवर्धन-प्राणिसंग्रहालय विभागप्रमुख करण्यात आले. 

- विधि अधिकारी अपर्णा थेटे यांना महिला व बालकल्याण, कामगार विभाग पुन्हा बहाल करण्यात आला.

- उपअभियंता एम.बी. काझी यांना दक्षता पथक, निवडणूक, यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादTransferबदली