शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मराठवाडी पाहुणचाराने नेपाळचे शेतकरी भारावले; रेशीम शेतीसाठी माजलगावात केला ४ दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 16:03 IST

Nepal's farmers in Marathawada : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे चार दिवस केला मुक्काम

ठळक मुद्देसोशल मीडियातून झाली मैत्री रेशीम शेतीची घेतली इत्यंभूत माहिती 

- पुरुषोत्तम करवामाजलगाव (जि. बीड) : तालुक्यात मागील २-३ वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून ( Silk Farming )मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत. याची माहिती सोशल मीडियाद्वारे ( Social Media ) नेपाळमधील ( Nepal ) शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांनी येथील शेतकऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतमैत्री केली. ती एवढी घट्ट झाली की,नेपाळच्या शेतकऱ्यांनी टालेवाडी येथे भेट दिली. येथील शेतकऱ्यांच्या शेतात तब्बल चार दिवस मुक्काम करत रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्नाबाबत सविस्तर माहिती घेतली. मराठवाडी पाहुणचाराने नेपाळचे शेतकरी भारावून गेले. ( Majalgaon's silk farming attracts Nepalese farmers; Overwhelmed by Marathwadi hospitality) 

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील शेतकरी शिवराज फाटे हे अनेक वर्षांपासून रेशीम शेती करत चांगले उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले. इतर शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मोफत माहिती देत ते फिरत असतात. त्यामुळे त्यांची शेती त्यांची पत्नी छाया व मुलगा वेदांत पाहतात. त्यांची रेशीम शेती पाहण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून शेतकरी येत असतात. या कुटुंबीयांची रेशीम शेती पाहण्यासाठी नेपाळ येथील महेश अधिकारी व त्यांची पत्नी सुनिता अधिकारी रविवारी आले होते. येथील शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान, कार्यपद्धती पाहून त्यांनी या ठिकाणी चार दिवस मुक्काम करत रेशीम शेती पाहिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याकडे उत्पन्न निघत नाही, कोषासारखे कोष तयार होत नाहीत व ते वजनदार नसल्याने उत्पन्न कमी होत असल्याचे रेशीम शेतीबाबत नेपाळच्या शेतकऱ्यांनी सांगितले.

विविध ठिकाणी केली पाहणीशिवराज फाटे यांची रेशीम शेती पाहून ते आनंदित झाले. याठिकाणी देशी मोर पडणारी रोगराई व हे पीक वाढविण्यासाठीचे उपाय, पर्यायांबाबत तर नित्रुड येथील शेतकरी सचिन लगड यांच्याकडे चॉकी व मकरध्वज बडे यांच्याकडे रेशीमच्या अळीबाबत माहिती घेतली. आडस येथील शेतकरी साजिद पठाण यांच्याकडे रेशीम धागानिर्मितीची पाहणी केली. तालेवाडी येथील दादासाहेब जगताप यांच्या शेतातही पाहणी केली.

रक्षाबंधन पाहून भारावलेनेपाळ येथील शेतकरी जोडपे टालेवाडी येथे रक्षाबंधनाच्या दिवशी आले होते. येथील रक्षाबंधन कार्यक्रम व सणसंस्कृती पाहून ते अतिशय भारावले. यावेळी त्यांना पुरणपोळी खूप आवडली. पुरणपोळी कशी बनवायची याची माहिती लिहून घेतली. त्यानंतर इतर दिवशी महाराष्ट्रीयन जेवणाचा स्वाद घेतला.

उत्पन्नवाढीसाठी निश्चित फायदाआम्ही अनेक वर्षांपासून रेशीमची लागवड करतो. याद्वारे रेशीमचे कपडे तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. आमच्याकडे तयार झालेली पहिली साडी येथील राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्नीसाठी नेली होती. महाराष्ट्रात आमच्यापेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी कसे घेतात याची आम्ही माहिती घेतली असून याचा उत्पन्नवाढीसाठी आम्हाला निश्चित फायदा होईल.- महेश अधिकारी, नेपाळचे शेतकरी.

लागवड ते विक्री सर्व माहिती दिली आम्ही अनेक गावांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी नेपाळ येथील शेतकऱ्यांना रेशीम लागवडीपासून ते कापड विक्री करण्यापर्यंतची माहिती दिली. यामुळे ते आनंदीत झाले.-शिवराज फाटे ,रेशीम उत्पादक शेतकरी

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagricultureशेती