शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेयेच्या संचालिका वर्षा सतपाळकर हिस पोलीस करणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:05 IST

नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे.

औरंगाबाद : कमी कालावधीत जास्तीचा मोबदला देण्याचे अमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांना गंडविल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांकडे तीन वर्षापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकरवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील मैत्रेय कंपनीने लाखो लोकांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवायला लावून त्यांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखविले. मल्टी लेवल मार्केटींग पद्धतीने काम करणा-या या कंपनीने हजारो एजंट नियुक्त केले. या एजंटांना वाढिव कमिशन आणि वरिष्ठ पद देण्याचे अमिष दाखवून जास्तीत जास्त  लोकांना गुंतवणुक करायला लावण्याचे टार्गेट दिले जात. एजंटांनीही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना मैत्रेय मध्ये गुंतवणुक करायला लावले. या कंपनीकडे गुंतवणुक करणा-याच्या विविध प्लॅन होते. विशेष म्हणजे मासिक तत्वावरही कंपनीकडून गुंतवणुक स्विकारली जात. प्रत्येक गुंतवणुकदाराला त्याची पावती आणि एक बॉण्ड मिळत. कंपनीचे उस्मानपुरा परिसरात एक अलिशान कार्यालय आहे. या कार्यालयात मोठा  कर्मचारी वर्गही होता. तीन वर्षापूर्वी हजारो गुंतवणुकदारांना मुदतीनंतरही त्यांचे पैसे मिळत नसल्याने पोलिसांत धाव घेतली. 

उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी तक्रारअर्ज नोंदविलेले आहेत. अशाचप्रकारच्या तक्रारी नाशिक, परभणी, पूर्णा आणि राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांना प्राप्त झाल्या. नाशिक  पोलिसांनी मैत्रेयच्या संचालिका सतपाळकर यांना अटक केली होती. तेव्हा त्यांनी गुंतवणुकदारांचे सर्व पैसे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली परत देण्याची तयारी न्यायालयासमोर दर्शविली होती. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाने संयुक्त खाते उघडण्यात आले होते. अशाचप्रकारची कार्यवाही औरंगाबादेत करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. यातील शेकडो गुंतवणुकदार असे आहेत की, मुदतीनंतर एजंटांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांना मिळणारी सर्व रक्कम पुन्हा कंपनीत गुंतवली. अशा सर्व लोकांनी पोलिसांत धाव घेतलेली आहे. आर्थिक गुन्हेशाखेकडे या केसची कागदपत्रे  अद्याप आलेली नाही.