शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:53 IST

Mahavir Jayanti: विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे.

- विजय सरवदेऔरंगाबाद : जैन धर्मावर व्यापक संशोधन व्हावे, विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ उपलब्ध व्हावेत, नव्या पिढीला भगवान महावीरांच्या पुरातन मूर्तीं, हस्तलिखितांचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करता येतील, या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University) लवकरच महावीर गॅलरी उभारली जाणार असून यासंदर्भात विद्यापीठ आणि भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा यांच्यात नुकताच करार झाला आहे.

विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे. यासंदर्भात महासभेच्या महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष वसंत वायकोस गुरुजी यांनी सांगितले की, महावीर गॅलरी उभारण्याचा संपूर्ण खर्च भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा करणार आहे. इतिहास विभागात यासाठी जागा निश्चित झाली आहे. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी यासंदर्भात करार झाला आहे. लवकरच गॅलरीचे भूमिपूजन होईल. करारानुसार १५ महिन्यांत गॅलरीची इमारत उभी राहील.

महावीर गॅलरीची कल्पनावसंत वायकोस गुरुजी यांनी १९७२ मध्ये विद्यापीठात अधीक्षक पदावर नोकरी करत होते. तेव्हा आर.पी. नाथ हे कुलगुरू आणि आर.एस. गुप्ते हे इतिहास विभागप्रमुख होते. वायकोस गुरुजी यांना जैन धर्मातील पुरातन हस्तलिखिते, मूर्ती अशा दुर्मीळ वस्तू संकलीत करण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाहन, चालक देऊन या कामासाठी रजाही मंजूर केली होती. वायकोस गुरुजी यांनी खेडोपाडी, गावागावांत जाऊन अनेक महावीरांच्या दुर्मीळ मूर्ती, हस्तलिखिते, साहित्य संकलित केले व ते इतिहास विभागात जमा केले. मागील चार वर्षांपूर्वी वायकोस गुरुजींकडे जैन धर्मीय मुनी महाराज पं.पू. पुनीतसागर महाराज यांनी विद्यापीठातील त्या वस्तूंचे अवलोकन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी त्या सर्व वस्तू पाहिल्या आणि तेथूनच विद्यापीठात स्वतंत्र महावीर गॅलरी असावी, अशी संकल्पना पुढे आली. महासभेलाही ही संकल्पना मान्य झाली आणि समाजबांधवांकडून यासाठी निधी संकलित करण्याचे काम सुरू झाले.

संशोधनासाठी पूरक गॅलरीमहावीर गॅलरीमध्ये जैन धर्माचे विचार, तत्त्वज्ञान यावर संशोधन करण्यासाठी रिसर्च सेंटर सुरू केले जाणार आहे. संशोधक विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ, मूर्तीवरील शिलालेख, दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध करून दिले जातील. इतिहास विभागातील म्युझियममध्ये हे साहित्य उपलब्ध आहे; पण ते सजपणे उपलब्ध करून देण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही गॅलरी उभारली जाणार आहे. विद्यापीठ जागा देईल आणि महासभा त्यांच्या खर्चातून इमारत उभारेल.- डॉ. पुष्पा गायकवाड, इतिहास विभागप्रमुख

दुर्मीळ साहित्यही देणारमहावीर गॅलरी उभारण्यासाठी वास्तुविशारद, कंत्राटदार निश्चित झाले आहेत. इमारतीसाठी ७६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे; परंतु बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे हा खर्च १ कोटीच्या जवळपास जाऊ शकतो. महावीर गॅलरीमध्ये जैन चेअर स्थापन केली जाणार असून त्या माध्यमातून संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी आम्ही जैन धर्मासंबंधीची दुर्मीळ ग्रंथ, पुस्तकेही देणार आहोत.- वसंत वायकोस गुरुजी, उपाध्यक्ष, दिगंबर जैन महासभा 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMahavir Jayantiमहावीर जयंती