शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
2
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
3
आता मेड इन इंडिया चिप्स जगभरात धुरळा उडवणार; इंटेल आणि टाटा यांची हा‍तमिळवणी, प्लॅन काय?
4
एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
5
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)
6
तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
7
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
8
Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
9
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
11
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
12
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
13
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
14
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
15
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
16
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
17
Nightlife: नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
18
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
19
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
20
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा मुंबईवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:41 IST

महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिवराज शेळके यांनी सुरेख गोलंदाजी करताना निर्णायक योगदान दिले.

ठळक मुद्दे१४ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धा : मराठवाड्याचे सचिन धस, सौरभ शिंदे, शिवराज शेळके चमकले

औरंगाबाद : महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिवराज शेळके यांनी सुरेख गोलंदाजी करताना निर्णायक योगदान दिले.मुंबईच्या बीकेसी मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २७६ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून जबरदस्त फार्मात असणाऱ्या व बडोदा संघाविरुद्ध २२८ धावांची खेळी करणाºया बीड येथील सचिन धस याने आपली तीच लय पुढे सुरूठेवताना सर्वाधिक १५७ चेंडूंत १४ चौकारांसह ८४ धावांची खेळी केली. तसेच त्याने अर्सिन कुलकर्णी याच्या साथीने ६९ व सुदर्शन कुंभार याच्या साथीने ५१ धावांची बहुमूल्य भागीदारी केली. सचिनशिवाय अर्सिन कुलकर्णीने ४५, सुदर्शन कुंभारने ४६ व ओमकार राजपूतने २४ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून झेनिथ सचदेव याने ४१ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर परभणीच्या सौरभ शिंदे याने ३0 धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईचा पहिला डाव अवघ्या १६0 धावांत गुंडाळला. मुंबईकडून प्रेम नाईक याने सर्वाधिक ५६ धावा केल्या. सौरभ शिंदे याला शिवराज शेळके व सुदर्शन कुंभार यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. पहिल्या डावात ११६ धावांची आघाडी घेणाºया महाराष्ट्राने दुसºया डावात सर्वबाद १२१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाºया सचिन धस याने दुसºया डावातही आपला विशेष ठसा उमटवताना ४९ चेंडूंतच १0 चौकारांसह ५२ धावांची सुरेख खेळी केली. तसेच पहिले तीन फलंदाज १९ धावांत तंबूत परतल्यानंतर सचिन धस याने किरण चोरमाले याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण अशी ६३ धावांची भागीदारी केली. सचिन धस याला साथ देणाºया किरण चोरमाले याने ४ चौकारांसह २४ व सुदर्शन कुंभारने १५ धावा केल्या. मुंबईकडून अनुराग सिंग याने ३८ धावांत ६ बळी घेतले. त्याला वरद वझे याने १४ धावांत २ तर रोनीत ठाकूर व झेनिथ सचदेवा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.त्यानंतर विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य घेऊन खेळणारा मुंबईचा संघ बीडच्या डावखुरा फिरकी गोलंदाज शिवराज शेळके याच्या जादुई फिरकी गोलंदाजीसमोर अवघ्या १५१ धावांत गारद झाला. मुंबईकडून उत्सव कोटी याने सर्वाधिक ५७ चेंडूंत सर्वाधिक ४५ व तर राजसिंग देशमुख याने ३ चौकार व एका षटकारासह ४२ धावा केल्या. शिवराज शेळके याने ४२ धावांत ५ गडी बाद केले. त्याला सचिन धस याने 0 धावांत २ तर निलय शिवंगी व किरण चोरमाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.पश्चिम विभागीय स्पर्धेत विजेतेपदाकडे वाटचाल करणाºया या महाराष्ट्राच्या संघाला १४ वर्षांखालील एमसीएचे निवड समिती सदस्य व व्यवस्थापक राजू काणे आणि प्रशिक्षक अजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.सं. धावफलकमहाराष्ट्र (पहिला डाव) : ११८.३ षटकांत सर्वबाद २७६. (सचिन धस ८४, सुदर्शन कुंभार ४६, अर्सीन कुलकर्णी ४५, झेनिथ सचदेव ३/४१, अनुराग सिंग २/४८).दुसरा डाव : ४१.२ षटकांत सर्वबाद १२१. (सचिन धस ५२, किरण चोरमाले २४, सुदर्शन कुंभार १५. अनुराग सिंग ६/३८, वरद वझे २/१४).मुंबई : पहिला डाव : ८१.२ षटकांत सर्वबाद १६0. (प्रेम नाईक ५६, रोनित ठाकूर ३१. सौरभ शिंदे ६/३0).दुसरा डाव : ४0 षटकांत सर्वबाद १५१. (उत्सव कोटी ४५, राजसिंग देशमुख ४२. शिवराज शेळके ५/४२, सचिन धस २/0, नीलय शिवंगी १/३५, किरण चोरमाले १/२१).