औरंगाबाद : विद्यापीठाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मुंबई संघांनी विजय मिळवला. आज झालेल्या लढतीत महाराष्ट्राने तेलंगणा संघाचा २ विरुद्ध 0 गोलने पराभव केला. आखिब मोमीन आणि सोहेल अली खान यांनी महाराष्ट्राकडून विजयी गोल केले. दुसºया साखळी लढतीत महाराष्ट्राने तामिळनाडू संघावर १-0 असा विजय मिळवला. विजयी गोल सोहेल खान याने केला. अन्य लढतीत उत्तम शाह याने केलेल्या गोलच्या बळावर मुंबईने पुणे संघावर १-0 अशी मात केली. नवीन मुंबईने बंगलोरचा १-0 असा पराभव केला. सचिन वर्माने विजयी गोल केला. महाराष्ट्राला तिसºया साखळी सामन्यात मात्र कर्नाटककडून ४-0 असा पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटककडून मो. अश्फाक, तौसीफ अहमद, इब्राहीम व मो. ताबीश यांनी गोल केले.तत्पूर्वी, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी अनिकेत केसरकर, आयोजन समितीचे सचिव रणजित भारद्वाज, मोहंमद रियाजोद्दीन, शेख अजहर, दीपक भारद्वाज, आकिब सिद्दीकी, मोहंमद सोहेल आदी उपस्थित होते.
सीनिअर सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:51 IST