शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : ...तर राज्यात सत्ताबदल निश्चित- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:43 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद : सीमेवर पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात केवळ निरोपावर आयोजित केलेल्या दौºयाला युवकांमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौºयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. त्याचा लाभ राज्यकर्त्यांना झाला. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचा संदेश जनतेत पोहोचवला. मी देशाच्या संरक्षण विभागाचा कारभार बघिलेला आहे, त्यामुळे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओळखीचे आहेत. या लष्करी अधिकाºयांना ‘पुलवामा’ घडला की घडवला याबद्दल शंका आहे; पण मी हा देशाचा विषय आहे म्हणून त्यावर बोलू नका, असे स्पष्टपणे सांगितले. पुलवामा घडण्यापूर्वी सत्ताधारी जाणार अशीच स्थिती होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखी घटना घडली नाही, तर सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मराठवाड्यात केलेल्या दौºयात २०० ते ३०० पदाधिकाºयांच्या बैठकीचे नियोजन होते. जाहीर सभा घेण्याची शक्यता नव्हती. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात हजारांपेक्षा अधिक पदाधिकाºयांनी उपस्थिती लावत अभूतपूर्व असाच प्रतिसाद दिला.>‘पंतप्रधानांनी प्रगल्भ विचार मांडावेत’देशाचे पंतप्रधान यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. त्या दौºयात त्यांनी केलेल्या कामांविषयी बोलणे आवश्यक होते. मात्र, शरद पवारांसारखाप्रगल्भ नेता असा उल्लेख करून चुकीचे वक्तव्य केले. पंतप्रधानांनी बोलताना प्रगल्भ विचार मांडावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मागील दीड वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेने चालली आहे. केंद्रीय अर्थमंत्री सतत काही तरी घोषणा करताहेत. मात्र, त्याने काही होत नाही. हा विषय आर्थिक आहे. त्याच्याशी खेळ करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019