शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:25 IST

स्थानिक भाजपचीही साथ

ठळक मुद्देकाँग्रेसने बदलली उमेदवारीसत्तारांना शह देण्यासाठी उतरणार मैदानात

औरंगाबाद : काँग्रेसने सिल्लोड मतदारसंघात जाहीर केलेली प्रभाकर पालोदकरांची उमेदवारी अचानक बदलल्याने राजकारणाने वेगळा रंग घेतला. त्यांच्याऐवजी कैसर आजाद यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी प्रभाकर पालोदकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी उशीरा रात्री पालोदकरांची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र गुरुवारी सकाळपासून सिल्लोड मतदारसंघात वेगाने हालचाली होऊन पालोदकर यांनी अपक्ष म्हणून लढावे, यासाठी भाजप आणि शिवसेनेतील निष्ठांतांनी आग्रह धरल्याने पालोदकर अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. पालोदकरांची उमेदवारी बदलणे आणि कैसर आजादसारख्याला उमेदवारी मिळणे यातून अनेक संकेत स्पष्ट झाले आहेत. 

भाजपच्या वाटेवर असलेल्या आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रवेशाला भाजपमधून तीव्र विरोध झाला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत त्याचे पडसाद उमटल्याने लगेचच सत्तार यांना शिवसेनेचा दरवाजा उघडा करून देत उमेदवारीही जाहीर केली. या घटना घडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमधील असंतोष अधिक तीव्र झाला आणि शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने पालोदकरांनी अपक्ष उभे राहावे असे प्रयत्न सुरू झाले होते. यासाठी काँग्रेस-भाजप या पक्षांमधील समविचारी नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतरही काँग्रेसतर्फेच लढण्यासाठी पालोदकर आग्रही होते. एका क्षणी पालोदकर उभे राहिले तरी भाजपमधील असंतुष्टांनी स्वबळावर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालू केली होती.

गुरुवारी दिवसभर यावर बरीच खलबते झाल्यानंतर सर्वांचा एकच उमेदवार म्हणून पालोदकरांच्या नावाला सर्वांनी संमती दिली आणि काँग्रेसची उमेदवारी न घेता त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दर्शविली. या खेळीने सत्तार विरोधकांच्या मताचे विभाजन टाळण्यात काँग्रेस आणि भाजपमधील मंडळी एका अर्थाने यशस्वी झाली आहे.जिंकणारा उमेदवार म्हणून भाजपने सत्तार यांना प्रवेश देण्याचे ठरविले होते; पण पक्षांतर्गत विरोध पाहून त्यांना सेनेकडे पाठविण्यात आले हे स्पष्ट झाले. आता सरळ लढतीत त्यांचाही कस लागणार असून, सिल्लोडची निवडणूक रंगतदार होईल, असे दिसते.

काँग्रेसच्या उमेदवारामुळे समीकरण बदललेअब्दुल सत्तार यांना चकमा देण्यासाठी काँग्रेसने सिल्लोड मतदारसंघात ऐनवेळी कैसर आजाद हा मुस्लिम चेहरा दिल्याने या मतदारसंघात आता मुस्लिम मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना काहीसा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालोदकर हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना