शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात ११३ हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 18:58 IST

काही ठिकाणी व्हीव्हीपॅटच्यादेखील तक्रारी आल्या.

ठळक मुद्दे ३४६ केंद्रांचे झाले वेबकास्टिंग मतदार व केंद्राच्या हालचालींवर नजर

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९८ ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले. पूर्ण जिल्ह्यात ११३ हून अधिक ठिकाणी ईव्हीएममध्ये मतदानादरम्यान बिघाड झाल्याचा ढोबळ आकडा होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅटच्यादेखील तक्रारी आल्या. राखीव यंत्रे तातडीने बदलून त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.

३ हजार २४ पैकी ३०६ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. ती मतदान केंदे्र संवेदनशील असल्यामुळे तेथील मतदार आणि केंद्रांवरील हालचाली राज्य निवडणूक आयोगाच्या पथकाने थेट प्रसारणाने पाहिल्या. कुठल्याही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही काही मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. मतदान केंद्रांवर सुरू असलेली प्रक्रिया कॅमेऱ्याच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई यांच्या कार्यालयातून पाहिली गेली. एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे १० टक्के केंद्र वेबकास्ट करण्यात आली. सिल्लोडमध्ये ३६, कन्नडमध्ये ३५, फुलंब्रीत ३४, औरंगाबाद मध्यमध्ये ३५, औरंगाबाद पश्चिममध्ये ३५, औरंगाबाद पूर्वमध्ये ३४, पैठणमध्ये ३३, गंगापूरमध्ये ३०, वैजापूरमध्ये ३४ ठिकाणची मतदान केंद्रे वेबकास्ट केली होती. 

२४ आॅक्टोबर रोजीचे मतमोजणी केंद्र असे- सिल्लोड विधानसभा मतदारसंघ- शासकीय टेक्निकल शाळा, सिल्लोड. - कन्नड विधानसभा मतदारसंघ- शिवाजी महाविद्यालय, इंडोअर स्टेडिअम.- फुलंब्री विधानसभा मतदारसंघ- सिपेट इमारत, विमानतळाजवळ, औरंगाबाद.  - पैठण विधानसभा मतदारसंघ- प्रशासकीय इमारत, संतपीठ, उद्यान रस्ता, पैठण.- गंगापूर विधानसभा मतदारसंघ- मुक्तानंद महाविद्यालय, इंडोअर स्टेडियम, गंगापूर.- वैजापूर विधानसभा मतदारसंघ - विनायकराव पाटील महाविद्यालय, सभागृह क्रमांक १, येवला रस्ता, वैजापूर. - औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ- शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा.- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा.- औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ- होमगार्ड कार्यालय (औरंगाबाद शहर), एन १२, हडको 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वpaithan-acपैठणvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरkannad-acकन्नडsillod-acसिल्लोडphulambri-acफुलंब्री