शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर सरकारचे एकच उत्तर '३७०'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:31 IST

विरोधकांचा आवाज बंद करण्याचे राजकारण यशस्वी होणार नाही 

कन्नड -कोणते ना कोणते कारण दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. कुणाच्या पाठीमागे इडीची चौकशी, कुणा विरुद्ध खटले दाखल करणे अशा प्रकारचे काम करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अशा पद्धतीचे राजकारण यशस्वी होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नड येथे बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ शहरातील गिरणी मैदानावर त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. 

पुढे बोलताना पवार म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, कारखाने बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या मात्र अशा प्रश्नावर सरकार उत्तर देतांना ३७० सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची विटही सरकारने लावली नाही. हे अपयश लपविण्यासाठी शरद पवारांनी काय केलं असा प्रश्न विचारतात. मंडल आयोगाची अंमलबजावणी, महिलांना आरक्षण, रोहयो कायदा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून दिला ही कामे केल्याचेही त्यांनी सांगीतले.

कन्नडचे सांगितले वैशिष्टय प्रत्येक तालुक्याचे काही तरी वैशिष्टय असते तसे कन्नडचे वैशिष्टय सांगतांना खराब रस्ते असेच सांगावे लागेल.एमआयडीसी नाही त्यामुळे कारखाने नाहीत आणि कारखाने नाहीत म्हणुन रोजगार नाही. शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. अशी तालुक्याची वाताहत झाल्याचे सांगुन विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkannad-acकन्नड