शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 16:25 IST

शिवेसना विरुद्ध भाजप बंडखोर मैदानात 

ठळक मुद्दे'औरंगाबाद पश्चिम'मध्ये भाजप बंडखोरी कायम

औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाठ उमेदवार अर्ज असले तरी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे निवडणूक रिंगणात कायम आहेत. दरम्यान, कॉंग्रेस उमेदवार रमेश गायकवाड यांनी अर्ज अवैध झाल्यानंतर खंडपीठात धाव घेतली होती. आज दुपारी सुनावणी घेण्यात आली असता गायकवाड यांनी याचिका माघार घेतल्याची माहिती आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच तयारी सुरु केली होती. दरम्यान, शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाठ यांनाच औरंगाबाद पश्चिममधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेल्या भाजपच्या राजू शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांना आव्हान दिले.  

आ. शिरसाठ यांच्या उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच शिंदे यांनी मतदारसंघात मोठे कार्यालय थाटून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यास सुरुवात केली होती. तसेच औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. यामुळेच शिरसाठ यांची उमेदवारी जाहीर झालेलीं असतानाही बंडखोरी करत शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याची चर्चा आहे.

२०१४ मध्ये भाजपा उमेदवार दुसऱ्या स्थानी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमShiv SenaशिवसेनाBJPभाजपा