शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बजेट २०२० : मुद्रांक शुल्क कपातीचा शहराला मिळावा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:31 IST

मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांतील बांधकाम क्षेत्राला व ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देक्रेडाईतर्फे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना देणार निवेदनमुंबईसह पुणे, नागपूरमध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर मंदीचा सर्वाधिक फटका ‘ड’ वर्ग महानगरपालिका हद्दीतील बांधकाम क्षेत्राला बसला आहे. यामुळे राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात एक टक्का केलेल्या कपातीमध्ये औरंगाबादसह नाशिक, कोल्हापूरचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई स्थानिक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली. मुंबईसह पुणे, नागपूरमध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत देण्यात आली आहे. यामुळे औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

यासंदर्भात प्राईड ग्रुपचे चेअरमन आर्कि. नितीन बगडिया यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून या क्षेत्राला मोठ्या मंदीतून जावे लागत आहे. ‘ड’ महानगरपालिका हद्दीतील बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कारण, महागाई जशी वाढत आहे त्या तुलनेत येथील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले नाही. विशेष म्हणजे मंदीची परिस्थिती लक्षात घेता येथील बांधकाम व्यावसायिकांनी घराच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. 

मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांतील बांधकाम क्षेत्राला व ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. औरंगाबादेत ६ टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्का रजिस्ट्री चार्जेस (नोंदणी शुल्क), असे ७ टक्के कर शुल्क आकारले जात आहे. जर येथे मुद्रांक शुल्कात १ टक्का कपात केली, तर ज्या नागरिकांनी ३० लाखांचे घर खरेदी केले त्यांच्या मुद्रांक शुल्कात ३० हजार रुपये वाचतील. याचा विचार करण्यात यावा. 

क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा यांनी सांगितले की, परवडणारे घर खरेदी करणाऱ्यांसाठी १ टक्का रक्कम खूप मोठी असते. औरंगाबाद शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई, पुणे व नागपूरप्रमाणे मुद्रांक शुल्कात १ टक्का कपात करण्यात यावी, या मागणीचे निवदेन तयार करण्यात येत आहे. लवकरच क्रेडाईचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन देणार आहे.

मंदीचा परिणाम येथेही आहेच ना !क्रेडाईचे कोषाध्यक्ष पंजाबराव तौर यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. घर खरेदी करणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतील सवलतीचा फायदाही मिळत आहे. मात्र, देशभर मंदीच्या वातावरणाचा परिणाम येथेही दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथेच मंदी नसून, सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे. औरंगाबादसारख्या शहरातील नागरिकांना घर खरेदीसाठी आणखी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व येथेही १ टक्का मुद्रांक शुल्क कपातीचे धोरण लागू करावे. 

टॅग्स :budget 2020बजेटAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय