शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बजेट २०२० : अनुशेष तसाच; मराठवाड्यातील सिंचनाला अल्प तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:40 IST

 राज्यपालांना भेटणार मराठवाडा विकास मंडळ सदस्य 

ठळक मुद्देराज्यात सिंचनासाठी एकूण १० हजार कोटींची तरतूदमराठवाड्याला काय वाट्याला येणार हे पुढच्या आठवड्यात कळणार

औरंगाबाद : शासनाने मराठवाड्यातील सिंचनासाठी अत्यल्प तरतूद केल्याचे शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून दिसते आहे. एकूण १० हजार कोटींची तरतूद असून, त्यामध्ये आपल्या विभागाला काय वाट्याला येणार हे पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पात सिंचनाच्या अनुषंगाने केलेल्या तरतुदीबाबत ते म्हणाले, स्वतंत्ररीत्या मराठवाड्याला सिंचनासाठी तरतूद होणे अपेक्षित होते. मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. मंत्रालयात ३ मार्च रोजी बैठक झाली होती. मराठवाडा वॉटर ग्रीड नाशिकपासून राबविला, तर फायदा होईल. जर प्रकल्प राबवायचा नसेल, तर स्पष्टच सांगा, अशी मागणीदेखील त्या बैठकीत केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये मराठवाड्याला अत्यल्प रक्कम मिळण्याची शक्यता आहे. विभागाचा अनुशेष तर मोठा आहेच, त्यासाठी वेगळ्या स्तरावर भांडावे लागणार आहे. ११ मार्चला अनुशेषाच्या अनुषंगाने राज्यपालांकडे बैठक आहे. इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याला कमी निधी मिळालेला आहे. कुणीही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मराठवाड्याची उपेक्षा होत आहे. अनुशेष बाकी तर आहेच. शिवाय नव्याने होणारी तरतूदही तुटपुंजी आहे. अनुशेष्२ा, शिल्लक राहिलेली कामे आणि नवीन योजना पाहता सिंचनाच्या पदरात अर्थसंकल्पातून खूप काही हाती लागलेले नाही, असे सध्या तरी दिसते आहे. 

११ मार्च रोजी राज्यपालांकडे बैठक ११ मार्च रोजी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह तज्ज्ञ सदस्य राज्यपालांकडे होणाऱ्या बैठकीत असतील. मागील पाच वर्षांत ८४ हजार कोटींची टप्पेनिहाय तरतूद होती. त्यातील मोठा अनुशेष अजून बाकी आहे. त्यातही अमरावतीला आजवर मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. या अर्थसंकल्पात केलेली तरतूद तुटपुंजी आहे. सध्या नागपूर आणि पुणे येथे ७० हजार कोटींची कामे शिल्लक आहेत. निधी तिकडे वळविला जात आहे. आपल्याकडील मंडळी याकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMarathwadaमराठवाडाbudget 2020बजेट