शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

Maharashtra Bandh : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्तारोको, एक बस जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 11:31 IST

मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेला बंद सुरू होण्यापूर्वीच पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टिव्ही सेंटर रस्त्यावर उभी असलेली बस पेटवून दिली.

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेला बंद सुरू होण्यापूर्वीच पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टिव्ही सेंटर रस्त्यावर उभी असलेली बस पेटवून दिली. सकाळपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मराठा समजाचे हजारो तरूण शांततेत रास्तारोको सुरू केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. 

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सकाळपासून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. नवा मोंढा जाधववाडी येथील भाजीपाला मार्केट पहाटे साडेपाच वाजता बंद झाले. टि.व्ही. सेंटर हडको येथील एका मंगलकार्याललयाजवळ उभी असलेली खाजगी बस अज्ञातांनी जाळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बसची आग विझविली.

पहाटे पासून बंदला सुरुवात

यासोबतच पहाटे साडेपाच वाजता हर्सूल टी पॉर्इंट येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक, सेवन हिल, पुंडलिकनगर चौक, धूत हॉस्पिटल चौक आदी ठिकाणी जोरदार रास्ता रोको सुरू झाला आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर बसलेले आंदोलक शासनाविरोधात घोषणाबाजी करून आरक्षणाची मागणी करीत आहे. हातात भगवे ध्वज घेतलेले तरूण रस्त्यावरील वाहतूक अडवित आहेत.

कामगारांना पिटाळलेबंदच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी बजाज अ‍ॅटो कंपनीने मात्र कंपनी सुरू ठेवल्याची माहिती आंदोलकांना कळाली.यामुळे पहाटे पाच वाजताच आंदोलक कंपनीच्या गेटवर जाऊन बसले होते.सकाळच्या शिफ्टचे कामगार बसमधून उतरताच आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. यात काही कामगार जखमी झाले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण