शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

Maharashtra Bandh : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:35 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्दे- शहरातील २७५ कोटींचे व्यवहार ठप्प - पेट्रोलपंप, हॉटेलसह विविध उद्योगांचा व्यवहार थांबला

औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे. 

मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे शटर गुरुवारी उघडलेच नाही. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहराला बसला. विशेषत: येथील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, पर्यटनाच्या व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ९९ टक्के बाजारपेठ बंद होती.

सरकारी तिजोरीत कर भरण्याच्या आकडेवारीचे गणित केल्यास जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दररोज ४०० कोटींची उलाढाल होत आहे. या एकूण उलाढालीपैकी शहरातील व्यवसायाचा २५० ते २७५ कोटींचा वाटा असतो. जर एक दिवस बाजारपेठ बंद राहिली तर जिल्ह्यात ४०० कोटींचे व्यवहार ठप्प होतात. यात जाधववाडी, मोंढा, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कपडा बाजार, सराफा बाजार यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे.

पेट्रोलपंपांचे ५ कोटींचे व्यवहार ठप्प गुरुवारी शहरातील व आसपासच्या परिसरातील  ३५ पैकी ३० पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. या काळात अवघे ५ पेट्रोलपंप सुरू होते. मात्र, दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी यातील ३ पेट्रोलपंप बंद करायला भाग पाडले होते. सायंकाळी काहीच पेट्रोलपंप सुरू झाले होते. यासंदर्भात पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे हितेश पटेल यांनी सांगितले की, पहिल्यांदाच शहरातील पेट्रोल कंपन्यांचे स्वत:चे पेट्रोलपंप बंद होते. शहरात दररोज ३ लाख लिटर पेट्रोल तर दोन लाख लिटर डिझेलची विक्री होते. व्यवस्थापनावरील खर्च, असे ५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

हॉटेल उद्योगाला फटका औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मगर यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे १७२ सदस्य आहेत. तसेच अन्य मिळून शहरात लहान-मोठे २५० हॉटेल रेस्टॉरंट, लॉज आहेत. एका दिवसात दीड कोटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदचा परिणाम येणारा आठवडाभर दिसून येईल. 

८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प बँकेतील सुमारे ८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. चित्रपटगृहांनाही आर्थिक फटका बसला. यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक रवी खिंवसरा यांनी सांगितले की, शहरात मल्टिप्लेक्स व सिंगल चित्रपटगृहांचे २७ स्क्रीन आहेत. या चित्रपटगृहांतील सर्व शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. खाद्यपदार्थांपासून ते पार्किंगपर्यंत विविध व्यवसायालाही तेवढाच फटका बसला. असा एकूण ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMarketबाजार