शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:17 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने लाटेचा फायदा एमआयएमला झाला होता, तसे यंदा होण्याची शक्यता कमी आहे.

ठळक मुद्देजावेद कुरैशी यांना गंगापूरचे गाजर परंतु ते अडून बसलेत मध्यसाठीच

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात तिकिटाचे प्रमुख दावेदार असलेले जावेद कुरैशी यांचा पत्ता अचानक कापून नगरसेवक नासेर सिद्दीकी यांना तिकीट देण्यात आले. एमआयएम पक्षातील एक मोठा प्रवाह कुरैशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मध्य विधानसभा मतदारसंघातच निवडणूक लढून आपली ताकद दाखवून द्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. जावेद कुरैशी बंड करू शकतात, असे लक्षात येताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डॅमेज कंट्रोल सुरू केले. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांच्यासमोर धरण्यात येत आहे. कुरैशी मध्य मतदारसंघावरच अडून बसले आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमला यश मिळाले होते. यंदा हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. पक्षाकडे ३० पेक्षा अधिक उमेदवारांनी तिकिटाची मागणी केली होती. २९ जणांना बाजूला सारून पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नासेर सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एमआयएम पक्षात उघडपणे दोन गट निर्माण झाले आहेत. तरुणाई कुरैशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सोशल मीडियावर एमआयएम नगरसेवक, कार्यकर्त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचा हा रौद्र अवतार पाहून पक्षानेही आता डॅमेज कंट्रोलची भूमिका स्वीकारली आहे. रविवारी जावेद कुरैशी यांच्यासमोर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कुरैशी यांचा पक्षाचा हा पर्याय तूर्त मान्य केलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या संकटात अधिक भर पडली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत गंगापूर विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना ५४ हजार मते पडली होती. त्यामुळे एमआयएम पक्षाला येथे यश मिळेल असा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. लोकसभेला वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत असल्याने हा कायापालट झाला. आता वंचित एमआयएमसोबत नाही. त्यामुळे फक्त मुस्लिम मतांवर येथे यश मिळविणे अशक्यप्राय आहे. एमआयएम पक्षाने मागील पाच वर्षांमध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघात संघटन उभे केले नाही. त्यामुळे या मतदारसंघात एमआयएमला मुस्लिम मतांशिवाय इतर मते मिळणे कठीण आहे. फक्त मुस्लिम मतांवर विजय संपादन करणे अशक्यप्राय आहे. 

पूर्वही एमआयएमला सोपे नाही...औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघही यंदा एमआयएम पक्षासाठी सोपा नाही. या मतदारसंघात काही अपक्षांनी चांगलेच दंड थोपटले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने लाटेचा फायदा एमआयएमला झाला होता, तसे यंदा होण्याची शक्यता कमी आहे. एका अपक्षाने जोरदार कंबर कसली असून, मागील दोन वर्षांपासून मतदारसंघात कामही सुरू केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद