शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:17 IST

जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रे आहेत.

ठळक मुद्देएकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांची नोंदणी  १६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी आज २७ सप्टेंबरपासून अर्ज घेण्याची व दाखल करण्याची सुरुवात होत आहे. सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी दाखल करता येईल. ४ आॅक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रे आहेत. यात २ हजार ९५७ मूळ मतदान केंद्रे, तर ६७ सहायकारी मतदान केंद्रे आहेत. २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार असून, २१ आॅक्टोबर मतदानाची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या तारखेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ३ हजार ६० पुरुष, १३ लक्ष ४६ हजार ६६९ महिला व इतर २६ असे एकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांची नोंदणी ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. १६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ५ आॅक्टोबर रोजी होईल. ७ आॅक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे. २४ आक्टोबर रोजी मतमोजणीचा कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे. 

निवडणूक निर्णय कार्यालय येथे- सिल्लोड- उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल, - कन्नड- तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा,- औरंगाबाद मध्य - शासकीय तंत्रनिकेतन उस्मानपुरा,- औरंगाबाद पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा,- औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय एन-१२,- पैठण- तहसील कार्यालय,- गंगापूर- तहसील कार्यालय,- वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर 

पश्चिम मतदारसंघात ३४२ मतदान केंद्रे विधानसभा मतदारसंघ क्र.१०८ पश्चिम हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदारसंघात ३४२ मतदार केंद्र आहेत. यात ३३६ मूळ तर ६ सहायक केंद्रे आहेत. या मतदारसंघात एकूण ३ लाख ३५ हजार ५९ एवढी मतदारांची संख्या आहे. यात १ लाख ७८ हजार ८३ पुरुष, तर १ लाख ५६ हजार ४६३ महिलांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल स्वीकारण्यात येणार आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात अर्ज दाखल करता येतील. अशी माहिती औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली. कर्मचाऱ्यांना २७ सप्टेंबर रोजी पहिले व दुसरे प्रशिक्षण २० आॅक्टोबर रोजी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक