शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:00 IST

मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते, तरी कुणी नाव ठेवले नसते

ठळक मुद्देपाणी, रस्ते, ड्रेनेजच्या प्रश्नांची सरबत्तीसमस्या सुटत नसल्याने महिलांनी केला प्रश्नांचा भडिमार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिलांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेने बुधवारी पक्ष सचिव आदेश बांदेकर (भाऊजी) यांचा ‘माऊली संवाद’ कार्यक्रम ठेवला खरा; पण शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज यासह विविध समस्या सुटत नसल्याने महिलांनी प्रश्नांचा जोरदार भडिमार केला त्यामुळे भाऊजींवर केवळ ‘माऊली... माऊली...’ असे उत्तर देऊन प्रश्नांना बगल देण्याची वेळ आली. 

महिलांच्या समस्यांचे गाºहाणे ऐकून आदेश बांदेकर यांनी नंतर उपस्थित शिवसेना नेत्यांचे कान टोचले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते तरी कुणी नाव ठेवले नसते. आगामी काळात जे आमदार निवडून येतील, त्यांनी या सुविधांकडे लक्ष दिले, तर शिवसेनेला कुणीही नाव ठेवणार नाही, असे सांगितले. 

श्रीहरी पॅव्हेलियन येथे विधानसभा निवडणुकीनिमित्त बांदेकर यांच्या उपस्थितीत महिलाकेंद्रित ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती. सव्वातासाच्या संवाद कार्यक्रमात बांदेकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र महिलांनी समस्यांचा एवढा भडिमार केला की बांदेकर यांना विनोदी उत्तरे द्यावी लागली. 

खासदार तुमचे होते, आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. तरीही काही कामे केली नाहीत, असा प्रश्न नाईकनगर सातारा परिसरातील महिलेने उपस्थित केला. बांदेकर यांनी याप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. खैरे यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल, असे सांगून वेळ मारून नेली. कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, अनिता मंत्री, नलिनी महाजन, सुनंदा खरात, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, प्राजक्ता राजपूत, दुर्गा भाटी, लक्ष्मी नरहिरे, नलिनी बाहेती, मीरा देशपांडे, जयश्री घाडगे आदींची उपस्थिती होती.

पश्चिम मतदारसंघात समस्यांचा पाढापश्चिम मतदारसंघातील अनेक समस्या महिलांनी मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजपुरवठा आदी समस्यांचा पाढाच महिलांनी वाचला. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातून जास्तीच्या महिला कार्यक्रमाला आल्या होत्या. २५ दिवस राहिले आहेत. आ. शिरसाट यांना ताकद द्या, अशी साद घालीत बांदेकर यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात संवाद साधून अनेक महिलांच्या प्रश्नांना ‘माऊली-माऊली’ करीत बगल दिली.  

महिला विचारतात ‘ताई’ आमचे काय?महिला आघाडीची एक पदाधिकारी बांदेकर यांना म्हणाली, प्रचार करण्यासाठी आम्ही जेव्हा महिला कार्यकर्त्यांना सोबत चला म्हणतो, तेव्हा त्या महिला म्हणतात, ‘ताई’ आमचे काय? प्रचारात आमचा वेळ जातो. त्याचे आम्हाला काहीही मिळत नाही. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी, झुणका-भाकर केंद्रासारखी योजना पुन्हा सुरू करावी. जेणेकरून पक्षाचे काम करणाऱ्या महिलांना उभारी मिळेल. यावर सचिव बांदेकर म्हणाले, इच्छाशक्तीने काम केल्यास सर्व काही मिळते. झुणका- भाकर केंद्र योजनेचा मुद्दा पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना