शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

Maharashtra Assembly Election 2019 : एमआयएमचे शहरातील ३ उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:01 IST

सोशल मीडियावर रंगले वॉर

ठळक मुद्देऔरंगाबाद ‘मध्य’मध्ये बंडाची चिन्हे तरुणाई जावेद कुरैशींच्या पाठीशी

औरंगाबाद : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सायंकाळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. मध्य विधानसभा मतदारसंघातून जावेद कुरैशी यांचा पत्ता कट करून माजी गटनेते तथा नगरसेवक नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली. पश्चिम विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचे पती अरुण बोर्डे यांना तर पूर्वमध्ये पुन्हा एकदा डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली. मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडाळी होण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मध्य’ मतदारसंघात सेना-भाजपच्या मतांचे उघडपणे विभाजन झाले होते. याचा थेट फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील या मतदारसंघातून निवडून आले होते. आता ते खासदार झाल्याने या विधानसभा मतदारसंघावर अनेकांचा डोळा होता. एमआयएमकडे ३० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. स्थानिक पातळीवर उमेदवाराची निवड करणे अशक्यप्राय होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उमेदवारीचा चेंडू ओवेसी यांच्या कोर्टात टोलावला होता. शुक्रवारी सायंकाळी ओवेसी यांनी टिष्ट्वट करून शहरातील तिन्ही उमेदवारांची घोषणा केली. 

पूर्व आणि पश्चिमच्या उमेदवारीवरून पक्षात फारसा वाद उफाळला नाही. मात्र, मध्य विधानसभेच्या मुद्यावरून तरुणाईने थेट ओवेसी यांच्या फेसबुक अकाऊंटवर जाऊन नाराजी दर्शविली आहे. अत्यंत चुकीचा, दुर्दैवी निर्णय असून, कुरैशी यांच्यावर अन्याय करणारा असल्याचे अनेक नेटिझन्सनी म्हटले आहे.एमआयएम पक्षाला शहरात उभे करण्यात जावेद कुरैशी यांचा सिंहाचा वाटा होता. अलीकडे ते पक्षापासून दुरावले होते. लोकसभा निवडणुकीत ओवेसी यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन त्यांना पक्षात आणले. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुनर्वसन होईल, असा अंदाज होता. ऐनवेळी पक्षानेही त्यांचा पत्ता कट केला.

अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारएमआयएम पक्षाकडे तिकीट मागणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांनी मध्य विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारीही सुरू केली होती. काहींनी तर संपर्क कार्यालयेही उघडली आहेत. उमेदवारी मिळो किंवा न मिळो, निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार नाही, असा मनोदय अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही बंडाळी थोपविणे एमआयएम पक्षासाठी मोठे आव्हान असणार आहे. 

पक्षाची कोअर कमिटी शहरातओवेसी यांनी उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीला गुरुवारी शहरात पाठविले. कालपासून या कमिटीच्या सदस्यांनी गोपनीय पद्धतीने शहरात भेटीगाठी सुरू केल्या होत्या. कमिटीच्या सूचनेनुसारच पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला असावा, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक