शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर

By योगेश पायघन | Updated: September 26, 2022 20:05 IST

संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर, औरंगाबादेत आंदोलन करून मागण्यांकडे वेधले होते लक्ष 

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेंतर्गत (महाज्योती) असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ‘सारथी’ आणि ‘बार्टी‘प्रमाणेच भत्ते देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर येथे मुख्य कार्यालयात; तसेच औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सारथी’, ‘बार्टी’ प्रमाणे घरभाडे भत्ता (एचआरए) आणि आकस्मिक भत्ते देण्याचा निर्णय झाला, मात्र सरसकट फेलोशिपच्या देण्याच्या मागणीवर अर्थ खात्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक नागपूर येथे महाज्योतीच्या कार्यालयात मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना नोंदणी दिनांकापासून पहिल्या २ वर्षांसाठी ३१ हजार तर, पुढील ३ वर्षांसाठी ३५ हजार रुपयांसह ‘एचआरए’ आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘एमफिल’ उमेदवारांना एमफिल. ते पीएचडी असे ‘इंटेग्रेटेड’ देण्याबाबत ‘बार्टी’च्या धर्तीवर तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. एमफिल उमेदवारांना ३१ हजारांसह ‘एचआरए’ आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दिल्ली येथे ‘यूपीएससी’ प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन १३ हजार रुपये व १८ रुपये आकस्मिक एकवेळ खर्च, ‘एमपीएससी’ मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाखतीस पात्र उमेदवारांना २५ हजार एकवेळ अर्थसहाय्य; तसेच व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना १० हजार रुपये प्रतीमहिना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे, संचालक सिद्धार्थ गायकवाड, मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाट यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री सावेंची भेटडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष बळिराम चव्हाण, विठ्ठल नागरे, विजय धनगर, आशिष लहासे, विद्यानंद वाघ, अभिषेक राऊत, सतीश पालवे, सोमनाथ चौरे, हनुमान रासवे, महेंद्र मुंडे आदींसह विद्यार्थ्यांनी नागपूर येथे मंत्री सावे यांची भेट घेत मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्री सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

औरंगाबादेत ठिय्या आंदोलनमहाज्योतीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्यावी. ‘बार्टी’, ‘सारथी’प्रमाणे ‘एचआरए’ आणि आकस्मिक भत्ते द्यावे. विभागीय कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे, अशी मागणी ठिय्या आंदोलनाद्वारे केली. अशोक जायभाये, देवानंद नागरे, रामप्रसाद सोनपीर, राम हुसे, सागर राठोड, स्वप्निल चंदने, मनिषा शिंदे, धनश्री जायभाये, कल्पना बडे आदींसह संशोधक विद्यार्थ्यांनी पोलीस बंदोबस्तात समाजकल्याण उपायुक्त व महाज्योती विभागीय कार्यालयात मागण्याचे निवेदन दिले.

निर्णय अर्थ विभागाच्या मान्यतेनंतरमहाज्योतीकडून पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप तसेच एचआरए आणि आकस्मिक भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. संशोधन फेलोशिपसाठी यावर्षी खुप अर्ज आले आहेत. त्या १५०० अर्जांना शासनाला किती खर्च लागेल त्याचा हिशेब करत आहोत. खर्चाची रक्कम मोठी असेल त्यासाठी अर्थ विभागाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. पुढच्या २-४ दिवसांत त्यासंबंधी निर्णय घेवू.-अतुल सावे, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र