शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

निकोलस यांच्या जादुई प्रयोगाने औरंगाबादचे रसिक अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:25 IST

जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे्रंडरिच यांनी अचंबित करणारे खेळ सादर करून उपस्थितांवर आपल्या जादूची मोहिनी घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे्रंडरिच यांनी अचंबित करणारे खेळ सादर करून उपस्थितांवर आपल्या जादूची मोहिनी घातली.सांस्कृतिक व कलाक्षेत्रात अग्रणी असलेल्या कलासागर संस्थेतर्फे निकोलस यांचे जादूचे प्रयोग आयोजित केले होते. कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.व्यासपीठावर येऊन अनोख्या शैलीत स्वत:ची ओळख करून देत निकोलस यांनी उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला. ज्याच्यासोबत प्रयोग करणार आहे त्याची देहबोली, सूक्ष्म निरीक्षण, उच्चारातील स्पष्टता आणि हातचलाखी यांचा वापर करून त्यांनी उपस्थिताना प्रभावित केले.एका प्रयोगादरम्यान त्यांनी बॅगेतून एक दोरी काढली. ती उपस्थितांना दाखविली. नंतर ती दोरी कापून दोन तुकडे केले आणि त्यानंतर ती दोरी पुन्हा जोडून दाखविली. आणखी एका प्रयोगात निकोलस यांनी प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वाक्षरीसह घेतलेली नोट खिशात ठेवली. त्यानंतर एक सीलबंद डबा प्रेक्षकांपैकी एकाच्या हातात दिला आणि त्यातून ती नोट काढून दाखविली. यासारखे अनेक आश्चर्यकारक प्रयोग सादर करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. लोकांच्या मानसिकतेवर आधारित विविध प्रयोग करून, तसेच क्लृप्त्या करून त्यांनी रसिकांचे पुरेपूर मनोरंजन केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कलाकृतीचा आनंद लुटला.प्रत्येक प्रयोगानंतर रसिक आश्चर्य व्यक्त करायचे आणि आता अजून पुढे काय याची डोळे विस्फारून प्रतीक्षा करायचे. यावेळी कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.जगभरात निकोलस यांची ओळख जादुगारपेक्षाही ‘मेन्टालिस्ट’ म्हणजेच मानसिक खेळ करून लोकांचे मनोरंजन करणारा कलाकार अशी आहे. याविषयी सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रयोगासाठी जेव्हा प्रेक्षकांमधून मी कोणालाही इथे बोलावतो, तेव्हा त्याच्या देहबोलीचा, चेहऱ्यावर दिसणाºया हावभावांचा सूक्ष्म अभ्यास करतो. मी काही करायला सांगितल्यावर एक सर्वसामान्य माणूस नेमका कोणता पर्याय निवडेल, याचा मला उत्तम प्रकारे अंदाज आल्यामुळे मी चटकन गोष्टी ओळखू शकतो.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटAurangabadऔरंगाबाद