शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:00 IST

इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.

औरंगाबाद : इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.जालना रोडवरील सागर लॉनवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करीत होते. मेळाव्यास विशेषत: ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर येथे होणारे पावसाळी अधिवेशन आम्ही शेतकºयांच्या प्रश्नांसाठी बंद पाडू, असा स्पष्ट इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला. ‘यांचा’ काय पायगुण चांगला नाही. मनुवादाला खतपाणी घालणारी ही मंडळी. आता आपला वैचारिक दुश्मन आरएसएस तर कॅन्सरप्रमाणे गावागावांत पसरत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा वेळी अधिक गंभीर होऊन बुथ कमिट्या स्थापन करण्याचे काम पूर्ण केले पाहिजे. आरएसएस, भाजप व शिवसेनेशी आपला मुकाबला आहे व समविचारी पक्षांशी दोस्ती करून देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी जिल्ह्यातील मतदारसंघवार आढावा घेतला. तय्यब पटेल (पैठण), भाऊसाहेब जगताप (औरंगाबाद पूर्व), नामदेवराव पवार (औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम), गोकुळसिंग राजपूत व बाबासाहेब मोहिते (कन्नड), पंकज ठोंबरे (वैजापूर), भरत तुपलोंढे (गंगापूर), भगवान मुळे (फुुलंब्री), संजय मोरे (खुलताबाद), रामदास पालोदकर (सिल्लोड) व आबा काळे (सोयगाव) यांनी आपला अहवाल सर्वांसमोर ठेवला. ‘कुणी खरं काम केलंय व कुणी बंडला मारल्या आहेत’ हे माझ्या लक्षात आलंय. फुलंब्रीचं काम उत्कृष्ट झालं आहे’ असा शेरा चव्हाण यांनी मारला.बघता काय मोर्चे काढा!खा.चव्हाण यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात शेतकºयांची अवस्था वाईट आहे. १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जमाफी कुठेच झालेली नाही. पण सरकार त्यांच्याकडे बघायला तयार नाही. हरभरा, तूर खरेदी नाही. पीक विमा कुठेच मिळालेला नाही. शेतकºयांना नवीन कर्जेही मिळत नाहीत. पाकिस्तानातून दाऊदला तर आणले नाहीच. पण तिथली साखर मात्र आणली. ही सारी परिस्थिती बघत बसू नका. शेतकºयांना कर्जे न देणाºया त्या- त्या बँकांंवर मोर्चे काढा, असा आदेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण