शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

‘लक्की ड्रॉ’ सूत्रधार पोलिसांना सापडेना

By admin | Updated: May 24, 2014 00:47 IST

आखाडा बाळापूर : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून विविध प्रकारच्या आकर्षक योजनांचे आमिष दाखवून सभासदांची फसवणूक करीत

आखाडा बाळापूर : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून विविध प्रकारच्या आकर्षक योजनांचे आमिष दाखवून सभासदांची फसवणूक करीत लाखो रुपयांचा गंडा घालणारे आठ जण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी विठ्ठल काळे यास अटक करण्यात आखाडा बाळापूर पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील व्यापारी रोहित रमाकांत अमिलकंठवार यांनी १४ मे रोजी या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्या आठ जणांनी पुष्कराज होम अप्लायसेंस नावाची प्रा. लि. कंपनी २७ सप्टेंबर २०१२ ते ९ जानेवारी २०१४ या काळात आखाडा बाळापूर येथे स्थापन केली. यामध्ये सुलभ हफ्त्याने वस्तू विक्री करून लक्की ड्रॉच्या माध्यमातून नोंदणी फीसच्या नावाखाली ५० रुपये व सुलभ हफ्त्याने ६०० रुपये दरमहा सभासदाकडून घेऊन फोर व्हिलर, टू व्हिलरचे आमिष दाखविण्यात आले होते. तसेच १ लाख रुपयांच्या अपघात संरक्षण विम्याचेही आमिष दाखविले होते. तर काही जणांकडून प्रत्येकी १ हजार रुपयेही घेण्यात आले. प्रत्यक्षात काहीही वस्तू न देता सभासदांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात आरोपी रवी धोत्रे (रा.श्री गणेश डेली निडस्, पुसद जि.यवतमाळ), संतोष चंद्रवंशी, संजय मुरकुटे (दोघे रा. हिंगोली), विठ्ठल काळे (आखाडा बाळापूर), सुधीर देशमुख (रा.अक्षय किराणा, कळमनुरी), विनायक माधव कदम (आखाडा बाळापूर), राजेश पौळ (नांदेड), ज्ञानेश्वर काळे या आठ जणांविरूद्ध कलम ४२०, ३४ भादंवि ४,५ महाराष्टÑ लॉटरी नियंत्रक व कर आकारणी आणि बक्षीस स्पर्धा कर आकारणी कायद्यानुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सदरील फसवणूक प्रकरणाचा तपास मात्र संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हिंगोली येथेही अशाच प्रकारे ‘लकी ड्रॉ’ द्वारे नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आला होता. आखाडा बाळापूरचे हे जिल्ह्यातील दुसरे मोठे प्रकरण आहे. या गुन्ह्याच्या तपासाबाबत आखाडा बाळापूर ठाण्याचे निरीक्षक महेंद्र देशमुख यांना विचारले असता, फसवणूक प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला आरोपी विठ्ठल काळे याच्या मागावर पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांचे पथक पाठविण्यात आले आहे. लवकरच इतर आरोपीही हाती लागतील, असे ते म्हणाले. (वार्ताहर)आखाडा बाळापूर येथे आठ जणांनी मिळून पुष्कराज होम अप्लायसेंस नावाची प्रा.लि. कंपनी २७ सप्टेंबर २०१२ ते ९ जानेवारी २०१४ या काळात स्थापन केली होती सुलभ हफ्त्याने वस्तू विक्री करून लक्की ड्रॉच्या माध्यमातून नोंदणी फीसच्या नावाखाली सभासदाकडून पैसे जमा करण्यात आलेसुलभ हप्त्याने रक्कम गोळा करून सभासदांना फोर व्हिलर, टू व्हिलर देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते तसेच १ लाख रुपयांच्या अपघात संरक्षण विम्याचेही आमिष दाखविले होते. तर काही जणांकडून प्रत्येकी १ हजार रुपयेही घेण्यात आले. प्रत्यक्षात काहीही वस्तू न देता सभासदांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला एकूण आठ आरोपींविरूद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून सदरील फसवणूक प्रकरणाचा तपास मात्र संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे मुख्य आरोपीही फरार आहे