शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कमी गुणवत्ताधारक ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना नियुक्त्या नको : खंडपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:31 IST

एसईबीसीला डावलून नियुक्ती देण्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका 

ठळक मुद्देमहावितरण कंपनीत अभियंता भरती  

औरंगाबाद : ‘एसईबीसी’ प्रवर्गातील  (मराठा) उमेदवारापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील उमेदवारांना  ज्युनिअर इंजिनिअर ट्रेनी व डिप्लोमा इंजिनिअर  ट्रेनी (पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी व पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी) पदावर याचिकेच्या पुढील सुनावणीपर्यंत  नियुक्ती न देण्याचे अंतरिम आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि   न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी ११ डिसेंबर रोजी  महावितरणला दिले. याचिकेची पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

महावितरण कंपनीने पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीच्या  २८  आणि  पदविका अभियंता प्रशिक्षणार्थीच्या ३२७  पदांसाठी जाहिरात  दिली होती.  याचिकाकर्ते आणि  इतर उमेदवारांनी मराठा आरक्षणाअंतर्गत एसईबीसी प्रवर्गातून  अर्ज केले होते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांची नावे निवड यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. नाशिक येथे कागदपत्रांची पडताळणी झाली. सदर उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती दर्शवून महावितरण कंपनीने याचिकाकर्ते तसेच इतर  निवड झालेल्या उमेदवारांचे त्यांच्या कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्तावही सादर केले. परंतु पुढे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियुक्तीपत्रे दिली नाही.

एसईबीसी मराठा प्रवर्गाला दिलेले आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी स्थगित केले. त्यामुळे महावितरण कंपनीने एसईबीसी मराठा प्रवर्गाच्या जागा बाजूला ठेवून इतर निवड  झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे  याचिकाकर्ते  अविनाश आव्हाड,  सतीश शिंगोटे, परमेश्वर भालके, भारती अंभोरे आणि  भागवत घाडगे यांनी ॲड. अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश न देण्याची विनंती  या याचिकेत करण्यात आली  आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठmahavitaranमहावितरण