शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 19:13 IST

या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

ठळक मुद्देभाजपकडून निष्ठावंताला न्याय उमेदवारी न मिळाल्याने खैरे नाराज

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना आश्चर्यकारकरीत्या लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा पक्ष प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यामुळे पत्ता कट झाला आहे. या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. कराड म्हणाले, सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने विचार केल्यामुळे आनंद झाला आहे. शिवसेनेला ही मोठी चपराक आहे. बुधवारी माझा बायोडाटा पक्षाने मागविला होता. परंतु अचानक उमेदवारी जाहीर होईल, असे वाटले नव्हते. पक्षनिष्ठेमुळे हे सगळे शक्य झाले आहे. शिवसेनेचे सात आमदार जिल्ह्यात असले तरी खासदार एमआयएमचा आहे. गेल्या लोकसभेत ३ ते ४ हजार मतांनी खैरेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मागील ३० वर्षांत पक्षासाठी केलेले काम पक्ष नेतृत्व विचारात घेईल, असे त्यांना वाटले होते. परंतु प्रियांका चतुर्वेदी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यसभा सदस्यत्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १३ मार्च अंतिम तारीख आहे. २६ मार्चला निवडणूक होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे प्रियांकांना उमेदवारीउमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे म्हणाले, आज सकाळपर्यंत वाटत होते की, पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आता यापुढे आपण काय बोलणार.माझ्यासारख्यावर जर अन्याय होत असेल तर इतर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे. चतुर्वेदी या काँग्रेसमध्ये होत्या. त्यापूर्वी त्या गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले. याच शहरात आजवर जे काही सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी मी धावून गेलेलो आहे. त्यामुळे राज्यसभेत का होईना परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर मला बोलता आले असते. मला उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच तिकडे भाजपने डाव खेळला, त्यांनी डॉ.कराड यांना उमेदवारी देऊन पक्षाला बळ दिले. माझी पण ताकद आहे, ती येणाऱ्या काळात दिसेलच. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाAurangabadऔरंगाबाद