शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव यंदा साध्या पद्धतीने, सकल जैन समाजाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 03:52 IST

कोरोनाचे घोंगावत्या सावटामुळे सामाजिक भान व शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन शोभायात्रा, देखावे, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे

औरंगाबाद : संपूर्ण भारतात नावलौकिक मिळविलेला औरंगाबादेतील भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव यंदा ६ एप्रिल रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचे घोंगावत्या सावटामुळे सामाजिक भान व शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन शोभायात्रा, देखावे, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, अशी माहिती सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी दिली.सकल जैन समाजांतर्गत सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन दरवर्षी शहरात मोठ्या उत्साहात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करतात. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यात विविध धार्मिक, सामाजिक संदेश देणारे सजीव, निर्जीव देखावे सर्वांचे आकर्षण ठरतात. या शोभायात्रेतून समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडत असते. यामुळे येथील शोभायात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात व राज्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. सावधगिरी बाळगण्यासाठी राज्य सरकारने यात्रा, शोभायात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सकल जैन समाजाने यंदा भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पैठणगेट येथून निघणारी भव्य शोभायात्रा, महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता महावीर चौकातील महावीर स्तंभ येथे धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच विश्वशांतीसाठी समाजबांधव आहे त्याच ठिकाणी सकाळी ९.३0 वाजता णमोकार मंत्राचा जप करणार आहेत.या बैैठकीला समाजाचे कार्याध्यक्ष सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, उपाध्यक्ष झुंबरलाल पगारिया, ललित पाटणी, सुनील राका, अनिलकुमार संचेती, सुधीर साहुजी, अमोल मोगले, विकास जैन, प्रशांत देसरडा, डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, विलास साहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, जिनदास मोगले मदनलाल आच्छा, रतिलाल मुगदिया, मिठालाल कांकरिया, ऋषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, मुकेश साहुजी, भारती बागरेचा, करुणा साहुजी, भावना सेठिया, सचिव इंदरचंद संचेती, संजय साहुजी, अशोक अजमेरा, रूपराज सुराणा, अजित गोसावी, संजय सेठिया आदींची उपस्थिती होती.कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उपकरणे, औषधी खरेदीभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात खर्च होणारा निधी सकल जैन समाजातर्फे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी राज्य शासनाला देण्यात येणार आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचाराकरिता लागणारे उपकरण व साहित्यासाठी हा निधी उपयोगात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJain Templeजैन मंदीर