शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

छत्रपती संभाजीनगरात भर दिवसाही लुटमार; दिवसाला चोरी, लुटीच्या किमान दोन घटना

By सुमित डोळे | Updated: December 5, 2023 12:00 IST

पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह; गेल्या १० महिन्यांमध्ये केवळ लुटल्याच्या २५० पेक्षा अधिक रेकॉर्डब्रेक घटना घडल्या आहेत

छत्रपती संभाजीनगर : गेल्या पाच महिन्यांमध्ये शहराच्या विविध भागांत पोलिसांऐवजी गावगुंड, लुटारूंची दहशत वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एके काळी निर्मनुष्य ठिकाणी, अंधारात लुटण्यात येत होते. आता मात्र, २४ तास शहरात नागरी वसाहत, रहदारीच्या दिवसाला चोरी, लुटीच्या किमान ३ घटना घडत आहेत. गेल्या १० महिन्यांमध्ये केवळ लुटल्याच्या २५० पेक्षा अधिक रेकॉर्डब्रेक घटना घडल्याने, शहर पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अप्पासाहेब दाभाडे (रा.बदनापूर) हे महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. ३ डिसेंबरला कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते शहरात आले होते. घरी परत जाण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सिडको चौकात बसची वाट पाहत थांबले. तेव्हा लांब केस असलेला तरुण त्यांच्याकडे गेला. ‘तुला कुठे जायचे आहे, मी सोडताे,’ असे म्हणत त्याने अचानक अप्पासाहेब यांची कॉलर पकडली. बळजबरीने ओढून उभे करत मोबाइल हिसकावून घेतला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने पळत येत, पैसे असलेले वॉलेट काढून घेत निघून गेले. तेवढ्यात एका दुचाकीस्वाराने तेथे जात ‘तुमचा मोबाइल, वॉलेट मी मिळवून देतो,’ असे म्हणत तो समोर गेला, परंतु लुटणारे दोघे त्याच्याच दुचाकीवर बसून निघून गेले.

आठ दिवसांपूर्वी विद्यानिकेतन कॉलनीत वर्षा सावळे या सायंकाळी ५ वाजता मुलीसोबत जात होत्या. यावेळी मोपेड दुचाकीवर आलेल्या चोराने पाठीमागून जात त्यांच्या हातातील मोबाइल, कागदपत्रे व दीड हजार रोख रक्कम असलेली पर्स ओढली. वर्षा यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हिसका देऊन पोबारा केला.

जुलैपर्यंत शंभरी ओलांडली, ऑक्टोबर अखेर २५०च्या पारकेवळ लुटमारीच्या घटनांनी शहरात जुलैअखेरच शंभरी ओलांडली होती. जुलैपर्यंत लुटल्याच्या ८८ घटना होत्या, तर मारहाण करून जबरी लुटल्याच्या ४३ घटना होत्या. त्यात बहुतांश घटना एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घडल्या. अशा दिवसाला किमान २ लुटीच्या घटना घडत आहेत. ऑक्टोबरअखेर हा आकडा २५० च्या घरात पोहोचला. मात्र, पोलिस विभाग अद्यापही याकडे गांभीर्याने पाहायला तयार नसल्याचे चित्र आहे.

नेमके घडतेय काय?-लुटमारीच्या सर्वाधिक घटना या मुकुंदवाडी, सिडको, एमआयडीसी सिडको, वाळूज, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर परिसरात घडत आहे.-सकाळी ६ ते १० व रात्री ५ ते १२ या वेळेत मोपेडस्वार, स्पोर्टस् बाइकवर येत सहज पर्स, मोबाइल ओढून नेतात.-मुकुंदवाडी परिसर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकावर सर्रास रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर.-रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवणे, मारहाण करून लुटले जाते.-रस्त्यावरील पोलिसांचा वावर कमी होणे, गांभीर्याने गस्त घातली जात नसल्याचे मत निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

समन्वयाचा अभावमोठी घरफोडी, लुटमार, सोनसाखळी चोरी सारख्या गंभीर घटना स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ अधिकारी, नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखेला कळवणे अपेक्षित असते. मात्र, कारवाईच्या स्पर्धेत स्थानिक पोलिसांकडून ते टाळले जाते. परिणामी, तपासावर परिणाम होऊन गुन्हेगारांची हिंमत वाढते.

गुन्ह्यांचा आलेखात वर, कारवाईत शून्यसिडको, एमआयडीसी सिडको ठाण्यांकडून लुटमारीत चार टोळ्या पकडल्या गेल्या. यात दोन अल्पवयीन मुलांची टोळीदेखील निष्पन्न झाली. मात्र, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, वाळूज, हर्सूल, बेगमपुरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घटना घडूनही गांभीर्याने तपास केला गेला नाही. येथील डीबी पथकदेखील सक्रिय नसून गुन्ह्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचा तपासाचा आलेख मात्र खालवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद