शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

साखळी पद्धतीने केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:02 IST

येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या ३२ महिन्यांपैकी ३० महिने महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये दिले. त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रक्कमेतून ७६४ खाजगी ग्राहकांची वीज बिले भरल्या प्रकरणी मनपाचे सहाय्यक अ.जावेद अ.शकुर व महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. मुळात या प्रकरणाची खोलावर जावून माहिती घेतली असता महानगरपालिकेचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेचे विद्युत पथदिव्यांचे २६७ मीटर आहेत. याशिवाय इतरही काही मीटर आहेत. या मीटरच्या नोंदीनुसार वीज वापराची बिले मनपा आरटीजीएसच्या माध्यमातून महावितरणकडे भरते. प्रत्येक मीटरचे वीज बिल भरल्यानंतर महावितरणकडून त्याची पावती दिली जाते. या प्रकरणात मात्र एकीकडे मनपातील एक कर्मचारी व दुसरीकडे महावितरणमधील एक कर्मचारी या दोघांनी मिळून मनपाच्या जेवढ्या मीटरचे वीज बिल भरण्यासाठी रक्कम आरटीजीएस झाली तेवढी रक्कम न भरता काही मीटरचे वीज बिल बाजूला ठेवले व त्या बदल्यात खाजगी व्यक्तीच्या मीटरचे वीज बिल भरले. ही प्रक्रिया गुन्हा दाखल झालेल्या दोघांकडून सुरु असताना मनपातील संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी एकूण मीटरपैकी किती मीटरची वीज बिले भरली, कितीच्या पावत्या जमा केल्या, याची पडताळणी करणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शिवाय लेखा विभागातील संबंधित अधिकाºयांनीही या संदर्भात काळजी घेतली नाही.