शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुकडाबंदीच्या ‘पळवाटे’ला लगाम; जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 20:27 IST

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलैपासून तुकडी बंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे एनए-४४ (अकृषी जमिनी/ नॉन ॲग्रिकल्चर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री तीन महिन्यांपासून बंद आहे.

ठळक मुद्दे बेकायदेशीर नोंदणी करणाऱ्या ८ उपनिबंधकांवर कारवाईअधिकृत मालमत्ता खरेदीचे आवाहन

औरंगाबाद : तुकडा बंदीमुळे मुद्रांकावर (बॉण्ड) मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा सपाटा सुरू असतानाच काही बहाद्दरांनी तुकडी बंदीवर शोधलेली ‘पळवाट’ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत मालमत्ता खरेदी न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

तसेच एका एकरात नोटरीवर भागीदारीतून प्लॉटिंग करून विक्री होत असेल, तर त्याची स्वतंत्र चतु:सीमा नोंदविली जाणार नाही. ८० आर जिरायती, २० आर बागायती जमिनीवरच खरेदी-विक्रीचे व्यवहार जिल्ह्यात होतील, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. तुकडी बंदी कायद्याचे उल्लंघन करून रजिस्ट्री करणाऱ्या ५ उपनिबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, तिघांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे, असे नोंदणी व मुद्रांक उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी सांगितले.

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलैपासून तुकडी बंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे एनए-४४ (अकृषी जमिनी/ नॉन ॲग्रिकल्चर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री तीन महिन्यांपासून बंद आहे. असे असताना एक एकरात १० ते १२ जणांची भागीदारी करून सातबाऱ्यानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. कायद्यातून पळवाट काढून अशा पद्धतीने मालमत्ता खरेदी केल्यास नागरिकांना भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे अधिकृत मालमत्ता खरेदीचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नागरिकांना केले. पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंग गव्हाणे, मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी उपस्थित होते.

बेकायदेशीर मालमत्तेचे तोटे असेव्यवहाराचे दस्तावेज न्यायालयीन पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. बांधकाम परवाना मिळत नाही. बँकांकडून कर्ज मिळत नाही. सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव लागणार नाही. चतु:सीमा निश्चित होणार नाही. नागरी सुविधा मिळणार नाहीत. नागरिकांची फसवणूक होऊ शकते. भूखंड, शेतीची पुनर्विक्री करणे अवघड होते.

अधिकृत मालमत्ता घेण्याचे फायदे असेबांधकाम परवाना, नागरी सुविधा, बँकेकडून कर्ज, केंद्र व राज्य शासन योजनांचा लाभ, सातबारा, मालमत्ता पत्रकावर स्वतंत्र नाव, अतिक्रमण होत नाही. पुन:विक्रीचे व्यवहार सुरळीत होतात. न्यायालयीन पुरावा म्हणून दस्तावेज गृहीत धरले जातात. नागरिकांचे आणि शासनाचे नुकसान होत नाही.

अधिकार-अभिलेख नोंद होणार नाहीजिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, भूमी अभिलेख विभागांना तुकडी बंदीत पळवाट काढून कुठे व्यवहार होत असतील, तर त्याच्या नोंदी अधिकार, अभिलेखावर घेऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. स्वस्तात प्लॉट, शेती म्हणून मंजूर रेखांकन नसलेले अकृषिक न झालेले अनधिकृत भूखंड, शेती, प्लॉट खरेदी-विक्री करू नये, नागरिकांनी फसवणुकीपासून सावधान रहावे, असे अवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद