शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

‘लोकमत’च्या स्पर्धेमुळे वाचनाची गोडी’

By admin | Updated: July 20, 2014 00:27 IST

नवीन नांदेड : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पोर्टस बुक धमाका व संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची ‘गोडी’ निर्माण झाली

नवीन नांदेड : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पोर्टस बुक धमाका व संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे वाचन संस्कृतीपासून दूर जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची ‘गोडी’ निर्माण झाली, असे मत मुख्याध्यापक के. ए. जोशी यांनी व्यक्त केले. नवीन नांदेड परिसरातील कुसुमताई विद्यालय, इंदिरा गांधी हायस्कूल आणि शिवाजी विद्यालयातील सर्व स्पर्धकांना लोकमतच्या वतीने आयोजित स्पोर्टस बुक धमाका स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कुसुमताई विद्यालयात आयोजित बक्षीस वाटप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संभाजीराव बिरादार होते. याप्रसंगी मुख्याध्यापक के.ए. जोशी, उपमुख्याध्यापक निजाम शेख, मेरवान जाधव, विलास बिरादार, किशोर इप्पर, प्रकाश बेळकोणे व रवी राजे आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर इंदिरा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. सी. देशमुख होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कुसुमताई विद्यालयातील आदिती अनिल जोशी हिस प्रथम,अनुजा संजय अटकोरे हिस द्वितीय, तर अनुपम श्याम पडलवार या विजेत्या स्पर्धकांना तृतीय बक्षीस प्रदान करण्यात आले. १० जुलै रोजी इंदिरा गांधी हायस्कूलचे विजेते स्पर्धक पूजा प्रकाश कावडे हिस प्रथम, कोमल माधव दूधमल हिस द्वितीय,तर खुशी नंदकुमार सरोदे हिस तृतीय बक्षीस देण्यात आले. शिवाजी विद्यालयातील चिन्मय रवींद्र रेपेकर यास प्रथम, ऋतुजा दत्तात्रय पारसेवार हिस द्वितीय व पायल शिवाजीराव वाघमारे हिस तृतीय बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक सिंधुताई तिडके यांनी, सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक जे.ई.गुपिले यांनी केले, तर मुख्याध्यापक बी. जी. निलेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सुनील देशमुख व एस.एस. चिटमलवार यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)