शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत रक्ताचं नातं; रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा झाला शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:52 IST

Lokmat Raktachenate : लोकमत भवन येथे महारक्तदान शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा शुभारंभ आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लोकमत भवन येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. कोरोना प्रादुर्भावात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय-अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरभरून सहभाग नोंदविला. (  Lokmat Raktachenate : The state level Mahayagna of blood donation was launched in Aurangabad ) 

लोकमत भवन येथे महारक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरात कोरोना प्रादुर्भावामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, अपघातग्रस्तांसह गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे ‘लोकमत’ने महारक्तदान शिबिराचे राज्यभर आयोजन केले आहे. औरंगाबाद येथे आयोजित शिबिरास रक्तदात्यांनी सकाळपासूनच मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. महारक्तदान शिबिराच्या शुभारंभानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनीही रक्तदान केले. त्यांची रक्तदानाची ही २६ वी वेळ होती. शिबिरात पहिल्या वेळी रक्तदान करणाऱ्यापासून ११५ व्या वेळी रक्तदान करणाऱ्यांचा सहभाग होता .

प्रमाणपत्रासह छायाचित्र, सेल्फीरक्तदान केल्यानंतर दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्रासह आणि ‘लोकमत रक्ताचं नातं’ असे घोषवाक्य असलेल्या सेल्फी पाॅइंटवर रक्तदाते छायाचित्र, सेल्फी घेत होते. अनेकांनी आपले छायाचित्र सामाजिक माध्यमांवर शेअर करीत रक्तदानाचे आवाहन केले. ...यांनी नोंदविला सहभागऔरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, ऑटोमोबाईल्स टायर्स ॲण्ड डिलर्स असोसिएशन, सीए संघटना, औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप, महावितरण अधिकारी-कर्मचारी, तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, शिक्षक संघटना, पोलीस अधिकारी-कर्मचारी, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नमोकार एसएमएस सेवा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आदींनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.

विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलनशिबिरात घाटीतील विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. विभागीय रक्तपेढीतर्फे विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी, रक्तपेढी प्रमुख डाॅ. सुरेश गवई, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. सिम्मी मिंज, डाॅ. प्राची मोडवान, डाॅ. दीपमाला करंडे, डाॅ. पूजा लगसकर, डाॅ. तेजस्विनी जाधव, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, तंत्रज्ञ पूजा जांगीड, देवकुमार तायडे, मजहर शेख, बबन वाघ, अविनाश देहाडे, मनोज पंडित, हमास शेख, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहा अक्कलवार यांनी रक्तसंकलनासाठी परिश्रम घेतले. तर लायन्स ब्लड बँकेतर्फे डाॅ. प्रकाश पाटणी, डाॅ. एजाज पठाण, जनसंपर्क अधिकारी मनोज चव्हाण, अनिलकुमार शर्मा, निलेश इंगल, सूर्यकांत तांबे, अश्विनी नरवडे, झाकेर माेहंमद, संदीप वाघमारे, नागेश हिवराळे, अविनाश सोनवणे, भारती अंध्याल यांनी रक्तसंकलन केले.

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी