शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लोकमत महामॅरेथॉनचा धडाका डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:20 AM

अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि अनेक प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणा-या लोकमत समूहातर्फे गतवर्षी जबरदस्त यशानंतर यंदा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा धडाका डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे.

औरंगाबाद : अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि अनेक प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणा-या लोकमत समूहातर्फे गतवर्षी जबरदस्त यशानंतर यंदा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा धडाका डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. लोकप्रियतेचे यशोशिखर गाठणाºया महामॅरेथॉनची सुरुवात नाशिक येथे २ डिसेंबरपासून होत आहे. त्यानंतर औरंगाबादला १६ डिसेंबरला, कोल्हापूरला ६ जानेवारी, नागपूरला ३ फेब्रुवारी आणि पुणे येथे १७ फेब्रुवारी होणार आहे.गतवर्षी चार शहरांत आयोजित महामॅरेथॉनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या महामॅरेथॉनमध्ये खेळाडूप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा आणि महत्त्वाचे म्हणजे परदेशातील धावपटूही सहभागी झाले होते.विशेष म्हणजे महामॅरेथॉनच्या मेडलवर आयोजित करण्यातआलेल्या त्या-त्या शहराचा नकाशा असणार आहे. औरंगाबादमध्ये महामॅरेथॉन जिंकल्यास त्या मेडलवर औरंगाबादचा नकाशा असेल. धावपटूने पाचही शहरांतील मॅरेथॉन पूर्ण करून मिळालेले मेडल्स जुळवल्यास ‘महाराष्ट्राचा’ नकाशा बनणार आहे, तसेच पाचही महामॅरेथॉन जिंकून हे मेडल्स पटकाविणारा धावपटू महामॅरेथॉनर ठरणार आहे.गतवर्षीच्या ‘लोकमत समूहा’तर्फे महाराष्ट्रातील चार मोठी शहरे नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर येथे महामॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी या वेळेस १७ फेब्रुवारी रोजी पुणे येथेही महामॅरेथॉन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार महामॅरेथॉनमध्ये तब्बल २२ हजारांपेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले होते.या वेळेस पुण्याचाही समावेश झाला आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंचा आकडा हा २५ हजारांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. ‘रनिंग’ संस्कृती देशात वेगाने वाढत आहे आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही.महाराष्ट्रातील नागरिक तंदुरुस्त राहावे या हेतूने आयोजित महामॅरेथॉन ही ‘फन रन’ (१२ वर्षांपेक्षाजास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १0 कि.मी.चीपॉवर रन (१६ पेक्षा जास्तवर्षांवरील) आणि २१ कि. मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ही ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वांसाठी खुली असेल. त्याचप्रमाणे लष्करातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे. आयोजकांना ही महामॅरेथॉन यशस्वी होईल, असा पूर्ण विश्वास आहे.>‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांनी ही महामॅरेथॉन वैयक्तिक सहनशक्तीची चाचणी घेण्याची संधी असेल, असे सांगितले.त्या म्हणाल्या की, ‘खेळाडूंनी फिटनेसवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करावे हा या महामॅरेथॉनचा हेतू असून, ‘लोकमत महामॅरेथॉन’चा प्रत्येक शिस्तबद्ध धावपटूने एक मैलाचा दगड पार करावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.‘लोकमत समूहा’चे सामाजिक आणि क्रीडा विभागात मोलाचे योगदान आहे. ‘लोकमत समूहा’ने नेहमीच खेळाडूंच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने नेहमीच व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.‘लोकमत समूह’ महामॅरेथॉनचे आयोजन करून ‘धावण्याची संस्कृती विकसित’ करीत आहे.>नाव नोंदणीस प्रारंभसीझन १ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार... तुम्हीही व्हा! लोकमत महामॅरेथॉन सीझन २ साठी आज रजिस्टर करा. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर शहरांचं एक सर्किट पदकासह...>पुणे महामॅरेथॉनचे पदक ठरणार मेगा आकर्षणऔरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या चार प्रमुख शहरांच्या प्रवासानंतर आता ‘लोकमत समूहा’तर्फे १९ फेब्रुवारी रोजी पुणे येथेही महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.‘महा टॅग पदक’ हेच महामॅरेथॉनचे खरे आकर्षण असणार आहे. पुण्यात नंबर १ असलेल्या ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉननिमित्त धावपटूंसाठी लिमिटेड एडिशन मेडल उपलब्ध करून देताना आयोजक म्हणून आम्हास आनंद होत आहे.या महामॅरेथॉनमध्ये नाव नोंदविण्यास धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्रातील इच्छुक धावपटूंनी सहभागासाठी आपल्या स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयातील इव्हेंट विभागात संपर्क साधावा. अधिक माहिती आणि आॅनलाईन नावनोंदणीसाठी www.mahamarathon.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन