शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्याही दंडबैठका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:55 IST

मराठवाड्यातील बहुजन मते वळविण्याचे आव्हान

ठळक मुद्देमराठवाड्यात बहुजन मतांचा आकडा मोठा अनेक मतदारससंघांत तिरंगी लढती बघायला मिळू शकतात

औरंगाबाद : भाजप-शिवसेनेशी लढा असल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या (वंबआ) उमेदवारांनी दंड बैठका सुरू केल्या आहेत. मराठवाड्यातील बहुजन मतांचा टक्का बघता, वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे अनेक मतदारससंघांत तिरंगी लढती बघायला मिळू शकतात. मात्र, ही मते वळविण्यात वंचित बहुजन आघाडीला कितपत यश मिळते हे निकालानंतरच कळणार आहे.

वंचित समाज घटकांना केंद्रस्थानी ठेवत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एआयएमआयएमला सोबत घेत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. सुरूवातीपासून चर्चेच्या वर्तुळात असलेली वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवित आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड, जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणाही केली आहे. मराठवाड्यातील बहुजन मतांचा आकडा मोठा आहे. मात्र, ही मते वळविण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर असणार आहे. 

कोठून कोण असेल मैदानात? जालना : खा. रावसाहेब दानवे आणि आ. अर्जुन खोतकर यांच्यामुळे चर्चेत असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. शरदचंद्र  वानखेडे हे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत. मागच्या वेळी त्यांनी बसपाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती.

नांदेड : नांदेडमधून प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ ते उच्च शिक्षित असून, धनगर आरक्षणासह इतर विषयावर त्यांचा अभ्यास आहे. बहुजन समाजातील मतांची संख्या नांदेड जिल्ह्यात मोठी आहे. एकट्या धनगर समाजाचेच दोन लाखांवर मतदार आहेत. त्यात एमआयएमसोबत असल्याने या निवडणुकीत त्यांना किती मते मिळतात, यावर सारे गणित अवलंबून असणार आहे. 

उस्मानाबाद : लोकसभा मतदारसंघातून अर्जुन सलगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बैठका, पथनाट्य आदी माध्यमातून सलगर यांनी मतदारांशी संवाद सुरू केला आहे. 

बीड : लोकसभा मतदारसंघातून प्रा.विष्णू जाधव यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. 

लातूर : वंचित बहुजन आघाडीने लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातून माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी होणार की नाही, याची बोलणी सुरू होती, त्याचवेळी वंचित आघाडीने गारकर यांचे नाव निश्चित केले होते.

परभणी : लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने हैैदराबाद येथील संगणक अभियंता आलमगीर खान अखिल महमद खान यांना उमेदवारी दिली आहे. ते मुळचे परभणी येथील असून, एआयएमआयएमचे प्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात.

हिंगोली : मोहन राठोड या नवख्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत उतरविले आहे. गेल्या निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMarathwadaमराठवाडा