शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

लाट नसल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान; मतांच्या ध्रुवीकरणावरच विजयाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:05 IST

उमेदवारांमध्ये एक खासदार; बाकी आमदार  

- नजीर शेख

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे.  २०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. 

चारवेळा विजयी झालेले खासदार खैरे हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना काँग्रेसचे आ. झांबड यांनी आव्हान दिले आहे. मात्र, एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत. दुसऱ्या बाजूला  आ. जाधव यांनी खैरेंविरुद्ध आघाडी उघडत दंड थोपटल्याने  निवडणुकीत रंगत आली आहे. 

मतदारसंघात एक गोष्ट दिसत आहे. आ. झांबड म्हणतात, माझी लढत खा. खैरे यांच्याशी आहे. आ. जलील म्हणतात, आम्ही शिवसेनेविरुद्ध लढा देत आहोत, तर आ. जाधव म्हणतात माझा मुकाबला केवळ खैरे यांच्याशी आहे. मात्र, शिवसेनेकडून आमची लढत एमआयएमशी असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे. 

खैरे यांना आ. जाधव यांचा धोका आहे, तर आ. झांबड यांना आ. जलील यांची भीती आहे. आ. जाधव यांची भिस्त ही मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. आ. जलील यांना वंचित आघाडीमुळे दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मते मिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची  नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार आ. झांबड यांना होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते  प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय  ध्रुविकरण कसे होते, यावर या चौरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.

शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचा हा किल्ला अभेद्य आहे. आतापर्यंत अनेकांनी हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच पाणी आणि रस्ते यावर आपला भर असेल. - चंद्रकांत खैरे, उमेदवार शिवसेना 

गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत. कचरा आणि पाणीटंचाईने औरंगाबादकर वैतागले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही युतीच्या विरोधात वातावरण आहे. आता बदल होणारच. - आ. सुभाष झांबड, उमेदवार, काँग्रेस

कळीचे मुद्दे- औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी. - मुद्यांवर फारसा प्रचार नाही. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या घटकांना आपल्याकडे वळविण्याच्या गणितावर भर.

प्रमुख उमेदवारसुभाष झांबड । काँग्रेसचंद्रकांत खैरे  । शिवसेनाइम्तियाज जलील । एमआयएमहर्षवर्धन जाधव । अपक्ष 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स