शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादमध्ये भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही; शिवसेनेने सांगितल्यासच प्रचारात उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:16 IST

पंतप्रधान मोदींसाठी खैरांना सहकार्य करण्याची भूमिका  

ठळक मुद्देभाजपच्या गोटात शांतता शिवसेना सांगेल त्याठिकाणी भाजपचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील.

औरंगाबाद : शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शिवसेनेने प्रचार कोठे कारायचा? कसा करायचा? याचे नियोजन केल्यास त्यात सहभागी होणार आहोत. भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

भाजपा-शिवसेना युतीतर्फे खा. खैरे यांच्या उमेदवारीची घोषणा शुक्रवारी मुंबईत करण्यात आली. मात्र मागील पाच वर्षांपासून भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली कटुता संपावी यासाठी युतीचा औरंगाबादेत संयुक्त मेळावा घेण्यात आला. हा मेळावा घेऊनही दोन्ही पक्षांतील कटुता संपुष्टात आलेली नसल्याचा प्रत्यय खा. खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच आला. जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजप खा. खैरे यांना मदत करणार आहे; मात्र स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही. शिवसेना सांगेल त्याठिकाणी भाजपचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील. भाजपने स्वत:हून प्रचार केल्यास त्याचाही गैरअर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे स्वत:हून काहीही न करता शिवसेना पदाधिकारी सांगतील त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. 

३० मार्च रोजी खा. खैरे दाखल करणार नामांकनदरम्यान, औरंगाबादचे विद्यमान खा. चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेतर्फे  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या ३० मार्च रोजी खा. खैरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. यासाठी विविध पंचांगकर्त्यांकडून वेळ पाहून घेतला असल्याचेही समजते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद