शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:15 IST

देशात भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे केले भाकित

ठळक मुद्देमोदी-फडणवीसांच्या कामांचा परिणाम शाहनवाज हुसैन यांचा दावा 

औरंगाबाद : देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहे. जनतेनेच स्वत: मोदी असल्याचे समजून कामाला सुरुवात केली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्रातही मोदींच्या तोडीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‘व्हाईटवॉश’ मिळणार आहे. ४८ जागांवर आघाडीचा सुपडासाफ करत भाजप-शिवसेना मुसंडी मारणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य शाहनवाज हुसैन यांनी केला.

जालना जिल्ह्यातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारसभांसाठी शाहनवाज हुसैन औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांचा दौरा केला आहे. त्यामध्ये मोदी विरोधात सर्व असाच सामना रंगला आहे. देशातील जनतेला मोदी हवे आहे. विरोधी पक्षांना मोदी नको आहेत. मोदींना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांनी इव्हीएम मशिनवर राग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आंधप्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांची अवस्था बिकट बनली. ते आता माजी मुख्यमंत्री बनणार आहेत. याशिवाय भाजपच्या पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, पर्वोत्तर राज्यामध्ये भाजपच्या जागा वाढणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मागील वेळा ७३ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ७४ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. देशात सगळीकडे मोदी यांच्याच नावाचा बोलबाला आहे. 

वंचित बहुजन आघाडी सोबत संबंध नाही

महाराष्ट्रात मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडूण येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची बी टिम असल्याचा आरोप होत आहे, यावर बोलताना शाहनवाज हुसैन म्हणाले, दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाही. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे काँग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आझम खान यांनी मर्यादा ओलांडल्याउत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपुर लोकसभाा मतदार संघाचे उमेदवार  आझम खान यांनी भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडणारे आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच घाणेरडी आहे. त्यांच्या विचारात व्हायरस आहे. त्या व्हायरसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांना रामपूरसह उत्तरप्रदेश आणि देशातील महिला माफ करणार नाहीत. त्यांचा पराभव हा निश्चितच होणार असल्याचेही शाहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपा