शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:21 IST

समाजकंटकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावी, यासाठी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा राज्याचे  दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी येथे पोलीस आयुक्तालयात घेतला. समाजकंटकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक अत्यंत पारदर्शक व्हावी, याकरिता निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. आयोगाच्या निर्देशाने प्रत्येक पोलीस परिक्षेत्राची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद परिक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड या मतदारसंघाची जबाबदारी एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. परिक्षेत्रातील चार मतदारसंघांतील निवडणुकीसाठी पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुलकर्णी हे दौऱ्यावर आहेत.

बुधवारी त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर एमपीडीए, हद्दपारीची कारवाई केल्याचे सांगितले. शिवाय  मारहाण, लुटमार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या सुमारे ९१२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. सीआरपीसी ११० कलमानुसार १६० जणांवर गुंडा कारवाई करण्यात आली. 

मतदान केंद्रांचे सादरीकरण शहरातील एकूण मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती सादर करण्यात आली. निवडणुकीसाठी उपलब्ध पोलीस बळ आणि बंदोबस्तासाठी मागविण्यात आलेले राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांची माहिती यावेळी सांगण्यात आली. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद