शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा फटका ! महापालिकेची मालमत्ता कर वसुली फक्त ११ टक्के; तिजोरीत केवळ ५३ कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 14:24 IST

Aurangabad Minicipality Property Tax : लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष.

ठळक मुद्देमहापालिकेकडून लॉकडाऊनचे कारणविकासकामांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता

औरंगाबाद : महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या मालमत्ता कर वसुलीचा आलेख प्रचंड खालावला आहे. मागील नऊ महिन्यांत फक्त अकरा टक्के वसुली झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष. वसुलीच नसल्यामुळे प्रशासनाने यंदा अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या विकासकामांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेची खालावलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अलीकडेच मालमत्ता वसुलीचा भार उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे सोपविला. मागील आर्थिक वर्षात तब्बल ११० कोटी रुपये एवढी विक्रमी वसुली झाली. त्यानंतर २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी थकबाकीसह मालमत्ताकराचे उद्दिष्ट तब्बल ४६८ कोटी रुपये निश्चित केले. परंतु, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरात कोरोना संसर्गाची साथ सुरू झाली. त्यामुळे जूनपर्यंत कर वसुली जवळपास बंदच होती. त्यानंतर हळूहळू वसुलीला सुरुवात झाली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. १ एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत नऊ महिन्यांत केवळ ५३ कोटी रुपये इतकाच मालमत्ता कर वसूल झाला आहे. हे प्रमाण अवघे ११.३७ टक्के इतके आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ६३ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. आता चालू आर्थिक वर्षाचे तीन महिनेच शिल्लक राहिले आहेत. आता संपूर्ण उद्दिष्ट गाठायचे झाल्यास राहिलेल्या तीन महिन्यांत ४०५ कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. नागरिक आणि व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यंदा वसुली शंभर कोटीपर्यंत जाईल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

नऊ महिन्यांत मालमत्ता कर वसुली :झोन अधिकारी- उद्दिष्ट- वसुली- टक्केवारी

१. नंदकिशोर भोंबे-४८ कोटी-३ कोटी ८५ लाख-०८ टक्के२. प्रकाश आठवले-४९ कोटी-३ कोटी ७६ लाख- ७.५ टक्के३. मुकुंद कुलकर्णी-३१ कोटी-१ कोटी ७७ लाख-५.५ टक्के४. विक्रम दराडे-३९ कोटी-३ कोटी ५१ लाख ८. ८ टक्के५. सविता सोनवणे- ५५ कोटी- ७ कोटी ५३ लाख१३. ०५ टक्के६. मीरा चव्हाण-४२ कोटी-४ कोटी १० लाख-९.६९ टक्के७. महावीर पाटणी-६४ कोटी-९ कोटी ३ लाख-१४ टक्के८. संतोष टेंगळे-७३ कोटी- ८ कोटी १ लाख- १०.८६ टक्के९. एस.आर.जरारे-६२ कोटी- ६ कोटी १९ लाख- ९.९१ टक्केमुख्यालय  -०००- ५ कोटी ५१ लाख - ००एकूण- ४६८ कोटी-५३ कोटी ३१ लाख-११.३७ टक्के

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका