शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चोरीची बाईक विकण्यासाठी बाहेर पडला अन पोलिसांच्या हाती लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 18:42 IST

Bike theft arrested दारूच्या व्यसनासाठी अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरणारा अटकेत

ठळक मुद्देदारूच्या व्यसनासाठी तो हे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी चोरलेल्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत होता.

औरंगाबाद: अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार अजय भाऊसाहेब गात (२१, रा. इंदीरानगर, बायजीपुरा)याला जिंसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

या कारवाई विषयी प्राप्त माहिती अशी की, जिंसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय जाधव, कर्मचारी अयुब पठाण, संपत राठोड, बी पी डोंबाळे, संजय गावडे, नंदलाल चव्हाण आणि शेख बासित हे गस्तीवर असताना कुख्यात आरोपी अजय गात याच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदीरानगर बायजीपुरा भागात तो पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. मात्र, अवघ्या काही फुटावर पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या मोटारसायकलविषयी चौकशी केली . तेव्हा त्याने २० एप्रिल रोजी रात्री व्यंकटेशनगर येथील गणपती रुग्णालयासमोरुन ही दुचाकी दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चोरल्याची कबुली त्याने दिली. यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्यांने जवाहरनगर, एम आय डी सी वाळूज आणि अन्य एका ठिकाणाहून तीन दुचाकी चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटारसायकल त्यांनी विविध ठिकाणच्या वाहनतळावर उभ्या करून ठेवल्या होत्या. या १ लाख ६० हजाराच्या चार  मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या. 

दोन महिन्यापूर्वी कारफोडून लॅपटॉप चोरला होता आरोपी अजय गात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. एका जणावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. शिवाय दिड ते दोन महिन्यापूर्वी अपेक्स रुग्णालय रोडवर अनेक वाहनांच्या काचा त्याने फोडल्या होत्या. एका कारमधून लॅपटॉप चोरला होता. या गुंह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. लॉक अप मधून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरवात केली.

मोटारसायकल विकण्याच्या तयारीत होता आरोपी गात चोरलेल्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत होता. मात्र लॉकडाउनमुळे त्याला खरेदीदार मिळत नव्हते. दारूच्या व्यसनासाठी तो हे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद