शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आता औरंगाबादमध्ये ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन; पेट्रोलपंप आणि हॉटेल्ससाठी नवीन नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 19:33 IST

Lockdown in aurangabad : लॉकडाऊनच्या काळात सकाळी आठ ते बारा या वेळेत सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध राहणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. आत्ता 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू असेल. यामुळे ३० मार्च रोजी सर्व व्यवहार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सकाळी आठ ते बारा या वेळेत सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध राहणार आहे. तसेच हॉटेल्स सुद्धा रात्री आठ वाजेपर्यंत केवळ होम डिलिव्हरी देऊ शकतील असे सुधारित आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी प्रशासनाने याबाबत आदेश काढले होते.त्यानुसार जिल्ह्यात जिल्ह्यात 30 मार्च ते आठ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असणार होता. मात्र, आता या आदेशात प्रशासनाने सुधारणा केली असून नवीन आदेशानुसार 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  सुधारित आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान इंधन उपलब्ध असणार आहे. 12 वाजेनंतर पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी यांनाच ओळपत्र दाखवून इंधन मिळणार आहे. नव्या आदेशात आणखी एक सुधारणा करण्यात आली असून शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्याने हॉटेल्सला रात्री आठ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची सूट देण्यात आली आहे.

यासोबतच पूर्वनियोजित परीक्षांसाठी हॉल तिकीट दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेशाची सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पूर्वीच्या आदेशातील प्रतिबंधित आणि सूट देण्यात आलेल्या बाबी तशाच लागू असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद