शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव बंगला येथे जिल्हा परिषद शाळेला कुलूप; शिक्षण सभापतींनी समोर आणला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:31 IST

जिल्ह्यात सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी ते विषय शिक्षकांच्या पथकांनी ३०० शाळांना भेटी दिल्या.

ठळक मुद्देशिक्षण सभापतींनी सोमवारी दुपारी दहेगाव बंगला येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी या शाळेत कुणीच नव्हते.

औरंगाबाद :  दहेगाव बंगला (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत  नियुक्त सातही शिक्षक सोमवारी हजर नसल्याचा प्रकार शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी उघडकीस आणला. सकाळी ९ ते २ वेळेत ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली आहे. या शासन आदेशाचे मुख्याध्यापकासह  शिक्षकांनी पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्ण्याचे  निर्देश त्त्यांनी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांना दिले.

शिक्षण सभापतींनी सोमवारी दुपारी दहेगाव बंगला येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी या शाळेत कुणीच नव्हते.  त्यांनी हा प्रकार शिक्षणाधिकारी जयस्वाल यांच्या कानावर घातला. जयस्वाल हे वाळूज येथील शाळेला भेट देत होते. त्यांनी दहेगाव येथे भेट दिली. या शाळेत साफसफाई केलेली नव्हती. तर शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांचे पथक पोहचल्यावरही येथे शाळेचे कोणीच हजर नव्हते. ही शासन आदेशाची पायमल्ली असल्याचे गलांडे यांनी सांगितले. 

मुख्याध्यापकांना शिस्तभंगाची ताकीदजिल्हा परिषद हायस्कूल वाळूजला जयस्वाल यांच्या पथकाने भेट दिली. त्यावेळी प्राथमिकचे १० तर माध्यमिकचे १३ शिक्षक हजर होते. ४३४ नववी ते बारावीचे विद्यार्थी पट संख्या असताना केवळ एक विद्यार्थी हजर होता. तीन दिवसांत कामात प्रगती दाखवा अन्यथा शिस्तभंगाची ताकीद मुख्याध्यापकांना देण्यात आली.

३०० शाळांना भेटीजिल्ह्यात सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी ते विषय शिक्षकांच्या पथकांनी ३०० शाळांना भेटी दिल्या. यात नियमांचे पालन केल्या की नाही यांच्या नोंदी करुन घेतल्या. सोमवारी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी कन्नड, खुलताबाद, किनगाव येथील शाळांना भेटी दिल्या. त्यात दहावीच्या पुरवणी परीक्षा सेंटरचीही पाहणी केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद