शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

छत्रपती संभाजीनगरातून भविष्यात धावेल लोकल आणि मेट्रो; प्राधिकरणाचे बेस मॅपचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:50 IST

२१०० स्के.कि.मी.मध्ये ३१३ गावांचा परिसर आहे. या भागासाठी एमएआरडीए ही ॲपेक्स यंत्रणा असेल.

छत्रपती संभाजीनगर : सीएसएमआरडीएने (छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण) पाच तालुक्यांतील २१०० चौ. कि.मी.तील बेस मॅपचे काम हाती घेतले असून, भविष्यात शहरातून लोकल रेल्वे आणि मेट्रो धावेल, असे नियोजन यात असेल. शहर व जिल्ह्याची लोकसंख्या जशी वाढेल, त्यातुलनेत वाहतुकीचे पर्यायदेखील उपलब्ध असावेत. त्यासाठी वाहतूक आराखड्याचा प्रकर्षाने यात विचार केला जाईल. लोकल, मेट्रोचे प्लानिंग प्राधिकरणाच्या मॅपमध्ये असेल. परंतु, त्यासाठी भविष्यातील लोकसंख्या, ट्रॅफिक यांचा विचार करून ते इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाईल. मनपा हद्दीच्या तुलनेत दहापट जास्तीचा हा आराखडा असेल.

पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, मलनिस्सारण वाहिन्यांची गरज ३१३ गावांत असणार आहे. सध्या बहुतांश प्रमाणात भूजलावर त्या गावांची तहान भागते आहे. त्यामुळे ३१३ गावांसाठी भविष्यात काय नियोजन असावे, यासाठी एक्झिस्टिंग स्टेट्स (विद्यमान स्थिती) काय आहे, यासाठी बेस मॅप तयार करण्यात येत आहे. २१०० स्के.कि.मी.मध्ये ३१३ गावांचा परिसर आहे. या भागासाठी एमएआरडीए ही ॲपेक्स यंत्रणा असेल. बांधकाम परवानग्या देणे एवढे एकच काम प्राधिकरणाकडे नाही. वाहतुकीचे नियोजन, एकात्मिक विकास समोर ठेवून काम होईल, मात्र यासाठी अद्याप डेडलाईन ठरलेली नाही.

बीपीएमएसद्वारे बांधकाम परवानग्या सध्या दिल्या जात आहेत. प्राधिकरणाच्या बाहेर भागासाठी आरडीसी पातळीवर, मनपा, नगरपालिका, सिडको पातळीवरूनही बांधकाम परवानग्या मिळतात. त्यांच्या हद्दीबाहेरील परवानग्या प्राधिकरणातून देण्यात येत आहेत. प्राधिकरण पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यासाठी प्राधिकरण हद्दीमध्ये गुंठेवारी करण्यात येणार आहे. भविष्यात ३१३ पेक्षा जास्त गावे यात येतील. प्लॅनिंग करून स्थिर विकासासाठी प्राधिकरण मॉनिटरिंग करेल. मनपा, जि. प., नगरपालिकांवर नियंत्रण असेल. पर्यटन व औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. पर्यटन आणि उद्योग यांचे क्षेत्र पाहून स्थिर नियाेजन आराखड्यात असेल.

नियोजनात एफएसआयचे नियम वेगळेझालर क्षेत्रातील २६ गावांसाठी सिडको आहे. मनपा हद्दीत महापालिका असेल. नऊ नगरसह प्राधिकरणात ३१३ गावे असतील. मनपा व सिडकोतील एफएसआयचे नियम वेगळे आहेत. प्राधिकरणातील एफएसआयचे नियम वेगळे आहेत.टोलेजंग इमारती बांधणे प्राधिकरणाच्या हद्दीत सध्या शक्य नाही. महापालिकेत बहुमजली इमारती बांधण्यास सुरुवात झाली आहे.

बेस मॅपचे काम सुरूप्राधिकरणाने पाच तालुक्यांतील ३१३ गावांतील बेस मॅपचे काही हाती घेतले आहे. ते झाल्यानंतर विकास आराखड्याचे काम सुरू होईल. त्यात मेट्रो, लोकलसह रस्त्यांचे जाळे, पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या, घनकचरा व्यवस्थापनाचा विचार होईल.- हर्षल बाविस्कर, सहसंचालक, सीएसएमआरडीए

कोणत्या तालुक्यातील किती गावे?गंगापूर : ६७फुलंब्री : १९खुलताबाद : ४१पैठण : ४३छत्रपती संभाजीनगर : १४३एकूण....३१३

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका