लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरासह जिल्ह्यात भारनियमन करण्यासाठी महावितरण विभागाने नऊ ग्रुप तयार केले आहेत. या गु्रपनुसारच तात्पुरत्या स्वरूपात भानियनम केले जात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी दिली. दरम्यान, वीज नसल्याने व्यापार, उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम होत आहे. तसेच गरमीने नागरिक घामाघूम होत आहेत.मागील काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. वेळी अवेळी वीज गुल होत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे येत आहेत. परंतु तांत्रिक कारण त्यांना माहिती नसल्याने दिवसेंदिवस या तक्रारी वाढू लागल्या आहेत. वेळच्यावेळी वीज बिल भरल्यानंतरही महावितरणकडून वेगवेगळ्या कारणांनी सतत वीजपुरवठा खंडित केला जातो.ाता कोळशाचा तुटवडा आहे, असे सांगत भारनियमनामुळे ग्राहकांमधून रोष व्यक्त होत आहे.
ग्रुपनुसार भारनियमन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:51 IST