शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दुसऱ्यांसाठी जगताना : १९ वर्षांत ५० हजार बोधीवृक्षांचे मोफत वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:35 IST

‘बोधीवृक्ष आपल्या दारी उपक्रम’, पर्यावरण चळवळ गतिमान करण्याचे आवाहन 

औरंगाबाद : ‘हर दिल से नफरत मिटाना है, बुद्ध को हर सांस में बसाना है’, असा निर्धार करून मी गेल्या तीस वर्षांपासून पर्यावरण चळवळीत कार्यरत आहे. ‘बोधीवृक्ष आपल्या दारी’ अभियानांतर्गत २००० सालापासून आम्ही सुमारे ५० हजार बोधिवृक्षांचे मोफत वाटप केले आहे, असे या अभियानाचे प्रमुख प्रा. राजेश भोसले पाटील यांनी सांगितले. 

२००० साली अफगाणिस्थानात लादेनने बुद्ध मूर्तीची विटंबना केली. रॉकेट लाँचरने बुद्ध मूर्ती तोडल्या. त्याचा निषेध म्हणून राजेश पाटील यांनी टीव्ही सेंटर चौकात लादेनचा पुतळा जाळला व टीव्ही सेंटर बंदची हाक दिली. रस्त्यावर जाळपोळ केली म्हणून पाटील यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली. सुटकेनंतर, पाटील यांनी एकच ध्यास घेतला की, ज्या तथागतांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला, त्यांच्यासाठी एकच संकल्प सोडला की ‘हर दिल से नफरत मिटाना है, बुद्ध को हर सांस में बसाना है.’या प्रसंगानंतरच्या पहिल्या पौर्णिमेपासून बोधीवृक्ष लावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ५० हजार बोधिवृक्षांचे वाटप करण्यात आले. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपासून ते १८ एप्रिल तथागत बुद्धांच्या जयंतीपर्यंत सकाळी १० ते ४ या वेळेत प्रा. राजेश पाटील हे भारतीय वंशांच्या झाडांचे मोफत वाटप करीत आहेत. ज्यांना बोधीवृक्ष, वड, कडुलिंब व उंबर, अशी झाडे लागवडीसाठी हवी आहेत, त्यांनी ओळखपत्राच्या पुराव्यानिशी डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेजचे कार्यालय, एन-१२, स्वामी विवेकानंद गार्डनसमोर, हडको येथून मोफत घेऊन जावीत. उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे वृक्षप्रेमींनी रोपे घरी नेऊन दि.७ जून किंवा चांगला पाऊस पडेपर्यंत जतन करावीत व योग्यवेळी खड्डा करून त्याचे किमान ३ ते ४ वर्षे संरक्षण करावे, असे आवाहन यासंदर्भात करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नेहरू युवा केंद्र, इंडियन डिफेन्स अकॅडमी, निर्भया डिफेन्स अकॅडमी, डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेज व बोधीवृक्ष आपल्या दारी- राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन महाकृती अभियान  कार्यरत आहेत. 

बोधीवृक्ष ध्यानधारणेसाठी उपयुक्तऔरंगाबाद शहराच्या दुतर्फा, लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच वेरूळ, अजिंठा, पितळखोरा, चैत्यभूमी, दीक्षाभूमीच्या दुतर्फा बोधीवृक्ष लावण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे. हजारो प्रकारचे वृक्ष असताना सिद्धार्थ गौतम पिंपळाखालीच का बसले, यामागे विज्ञान आहे, हे समजून घेतले पाहिजे. बोधीवृक्ष २४ तास आॅक्सिजन देतो, बोधीवृक्ष ध्यानधारणेसाठी उपयुक्त आहे. हृदयरोगावरही बोधीवृक्ष उपयुक्त आहे. बोधीवृक्ष रक्त शुद्धिकारक, बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक, रोगनाशक आहे. ‘बुद्ध हवा, तर बोधीवृक्ष लावा’ असे आवाहन या अभियानातर्फे करण्यात आले आहे.

एक तरी बोधीवृक्ष लावा... औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांमध्येसुद्धा बोधीवृक्ष वाटप करण्यात आले. बुके, फुले, हाराऐवजी बोधीवृक्ष, असा संदेशही देण्यात आला. प्रत्येकाच्या घराजवळ किंवा जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी प्रत्येकाने किमान एक तरी बोधीवृक्ष लावावा व तो जगवावा हा यामागचा उद्देश.बोधीवृक्ष फक्त एक झाड नाही, तर बोधीवृक्ष जीवन आहे, एक क्रांती आहे, एक चैतन्य आहे. जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बोधीवृक्ष आहे, अशी मांडणी राजेश भोसले पाटील करतात.

टॅग्स :Natureनिसर्गAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक