बालाजी कटके , रेणापूरयेथील बैलबाजार हा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे़ रेणापूरच्या बैल बाजारास शुक्रवारपासून सुरूवात झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैल जोडींची संख्या विक्रीसाठी वाढली आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा बाजारालाही लवकरच सुरूवात झाली आहे़ रेणापूर येथील बैल बाजारात जिल्ह्याबरोबरच आंध्र, कर्नाटक व गुजरात राज्यातून व्यापारी खरेदीसाठी दाखल होत असतात़ बाजारात विविध जातींच्या बैल जोडींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ दरवर्षी हा बाजार रबी हंगाम संपुष्टात आल्यानंतर सुरू होतो़ परंतू, यंदा रबी हंगाम संपुष्टात येण्यास आणखीन कालावधी असताना जानेवारीअखेरपासूनच सुरूवात झाली आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलजोडींची संख्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ शुक्रवारी बैलबाजाराचे उद्घाटन झाले़ यावेळी सरपंच विठ्ठल कटके, उपसरपंच वसंत राठोड, ग्रामपंचायत सदस्य दिलीप राजे, अभिषेक आकनगिरे आदी उपस्थित होते़ लातूर जिल्ह्याबरोबरच बीड जिल्ह्यातील पशुपालक आपल्या बैलजोड्या आणल्या आहेत़
पशुधन बाजार बहरला
By admin | Updated: January 30, 2016 00:27 IST