शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘माय-बापांसाठी थोडेसे काही’; विभागीय प्रशासन ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 13:49 IST

मराठवाड्यात ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे.

ठळक मुद्दे संपत्ती, जमिनीच्या वाटण्या केल्यानंतर ज्येष्ठांचे प्रचंड हाल होत असल्याने अनेक नागरिक विभागीय प्रशासनापर्यंत येत आहेत.ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी ग्रामीण भागात कुठेही जागा मिळत नाही. कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात लोकसंख्येच्या १५ टक्क्यांच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील बहुतांश ज्येष्ठांचे कोरोना काळात प्रचंड हाल झाले. या नागरिकांसाठी मराठवाड्यात ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. ज्येष्ठांसाठी सुविधांसह ग्रामपंचायतनिहाय विरंगुळ्याची ठिकाणे तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ज्येष्ठांना अनेकदा घरातील अडगळ म्हणूनही पाहिले जाते. पाल्यांकडून त्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. संपत्ती, जमिनीच्या वाटण्या केल्यानंतर ज्येष्ठांचे प्रचंड हाल होत असल्याने अनेक नागरिक विभागीय प्रशासनापर्यंत येत आहेत. कोरोना काळात अशा तक्रारींचा आकडा मोठा होता. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेंकर यांनी हा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन काही महिन्यांपूर्वी केले असून त्याला मूर्त रूप येत आहे.

ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी ग्रामीण भागात कुठेही जागा मिळत नाही. कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. गावात विरंगुळ्याचे त्यांना हक्काचे ठिकाण नाही. त्यामुळे एकत्र येऊन एकमेकांचे सुखदु:ख जाणून घ्यावे. यासाठी एका छोटेखानी सभागृहाच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, वर्तमानपत्रे तसेच मासिकांची आणि पुस्तकांची व्यवस्था करण्यात येईल. बसण्यासाठी खुर्च्या, सतरंजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. कोरोना काळ असल्यामुळे सुरक्षित अंतर राखता येईल, अशा पध्दतीने त्या सभागृहात ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था असेल. यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षणया उपक्रमाचे प्रमुख उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी सांगितले, मराठवाड्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आशा वर्करच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये त्यांना कुठल्या सुविधा गरजेच्या आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. काही ठिकाणी सभागृहाचे काम करण्यात येत आहे. जुन्या सभागृहाची दुरुस्ती करण्यात येत असून काही ठिकाणी या विरंगुळा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

वृध्दापकाळ तणावमुक्त करण्याचा प्रयत्नआयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले, या अभियानाच्या माध्यमातून मेडिकल शिबिर घेऊन ज्येष्ठांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. या सर्वेक्षणात ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांच्या काय अडचणी आहेत, हे समोर येईल. वृद्धापकाळ सुसह्य व तणावमुक्त करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. त्यासाठी घाटीच्या जिरियाट्रिक विभागाची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादSenior Citizenज्येष्ठ नागरिकMarathwadaमराठवाडा