वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील देशी दारूचे दुकान सुरू करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. महिलांनी पुढाकार घेऊन दारूचे दुकान बंद करण्याची एकच मागणी केल्याने दुकान मालक ग्रामस्थांच्या दबावापुढे झुकत दुकान बंद केले. तसेच दुकानदाराने पोबारा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली दारूची दुकाने बंद करण्याची आदेश दिल्यानंतर तत्काळ दुकाने बंद करण्यात आली. परंतु शासनाने ५ एप्रिल रोजी नव्याने आदेश काढून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकसंख्या २० हजारापेंक्षा कमी आहे आणि ज्या दुकानाचे अंतर २२० मीटरपेक्षा जास्त आहे. अशा दुकानांचे नूतनीकरण करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. वालसावंगी येथे गावात मध्यभागी असलेली दुकान गावाबाहेर हलविण्याची मागणी ग्रामस्थांतून वारंवार होत आहे. शनिवारी देशी दारू दुकान सुरू होण्यापूर्वी तीव्र विरोध करून दुकान उघडू नये आवाहन केले. ग्रामस्थांचा रोष पाहून दुकानदाराने दारूची खोके टेम्पोत भरल्याने वाद निवळला. गावातील दुकान गावाबाहेर हलविण्याची मागणी सलीम सौदागर, शेख पाशा, हरी वाघ, विवेक भाले, शेख अश्फाक शेरखाँ आदींनी केली आहे.
दारू दुकानास विरोध..!
By admin | Updated: April 8, 2017 23:44 IST