शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाविरुद्ध अंगावर ओतले रॉकेल

By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST

परभणी : शहरातील कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी सर्व पक्षीय नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी सर्व पक्षीय नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ येथील कारेगाव रोड भागात जिल्हा उद्योग केंद्र, वन विभागाच्या कार्यालयासमोरच दारुचे दुकान थाटले आहे़ या परिसरात दुकानाच्या पाठीमागील बाजूस मुलींची शाळा, खाजगी शिकवण्या, शासकीय कार्यालये आणि नागरी वसाहत असल्याने दुकानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे़ तेव्हा येथील दुकान हटवावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दुकान सुरू करण्यास परवानगी दिली व हे दुकान सुरू झाले होते़ त्यामुळे दुकानाला विरोध दर्शविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता़ या इशाऱ्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास नगरसेवक आणि वसाहतींमधील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़ कार्यालयात येत असतानाच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जिल्हा सरचिटणीस विशाल बुधवंत, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, प्रशास ठाकूर, विश्वजीत बुधवंत, रितेश जैन, अक्षय देशमुख, गणेश टाक आदींनी अंगावर रॉकेल ओतून प्रशासनाच्या विरूद्ध घोषणाबाजी केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत काडीपेटी व रॉकेलचा डबा आंदोलकांकडून ओढून घेतला. त्यानंतर आंदोलकांनी दारू बंदी झालीच पाहिजे, अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला़ नगरसेवक आणि नागरिकांचा विरोध झुगारून दारू दुकानाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ अर्धा तास घोषणाबाजी झाली़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले़ यावेळी प्रेरणाताई वरपूडकर, नगरसेविका माधुरी बुधवंत, वनमाला देशमुख, उषाताई झांबड यांच्यासह नगरसेवक प्रशास ठाकूर, चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत, विश्वजीत बुधवंत, सय्यद कादर, चेतन सरकटे, श्री सलगर, रवि राजपूत, मनोज कुलकर्णी आदींनी दारू दुकानाला विरोध केला़ हे दारुचे दुकान तात्काळ बंद करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ त्यावर जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी आजच तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले़ तसेच महानगरपालिकेचा दारु दुकानाविरूद्ध ठराव घ्यावा, असा सल्ला दिला़ त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून हे दुकान बंद करावे, त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज काय, असा सवाल बाळासाहेब देशमुख यांनी केला़ महापालिकेची पुढील सभा होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल़ त्यामुळे सध्या तरी दुकानाचा परवाना रद्द करावा, सर्वसाधारण सभेत आम्ही ठराव घेवू, असे सर्व नगरसेवकांसह विशाल बुधवंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले़