शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लायन्सचे समाजकार्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची जिद्द हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:15 IST

लायन्स क्लब हे समाजकार्यात अग्रेसर असून, शेवटच्या घटकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्याची जिद्द प्रत्येक सदस्यात कायम रुजली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लायन्स क्लब हे समाजकार्यात अग्रेसर असून, शेवटच्या घटकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्याची जिद्द प्रत्येक सदस्यात कायम रुजली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.औरंगाबादेत १८ वर्षांनंतर लायन्स क्लब इंटरनॅशनल बहुप्रांतीय परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल संदीप मालू, उपप्रांतपाल विवेक अभ्यंकर यांच्या टीमचा तसेच नवीन विविध अध्यक्षांचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन शनिवारी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र दर्डा म्हणाले की, बिंदुसरेचा पूर व लातूरच्या भूकंपात मदतीसाठी धाऊन जाणारे पहिले हात फक्त लायन्सचेच होते. नव्या पिढीला ही माहिती असावी.लायन्सची मुख्य मार्गदर्शक टीम तीच आहे. लायन्स क्लबच्या विविध शाखा तयार करण्यात येत आहेत. वर्षभर त्या व्यवस्थित चालतात काय, त्यांचे पदाधिकारी काम व्यवस्थित करतात की नाही, याचा लेखाजोखा ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकावर जबाबदारी टाका. समाजकार्यात लायन्सची जागतिक पातळीवर ओळख असून, प्रत्येकांनी समाजसेवेचे व्रत अंगी बाळगलेच पाहिजे, असेही दर्डा म्हणाले. नव्याने लायन्समध्ये येणाऱ्यांचा समारंभातून उत्साह वाढविण्याचे काम एमजेएफ एम. के. अग्रवाल यांनी सातत्याने केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण वाघमारे, संजीव गुप्ता यांनी केले तर आभार राजेश भारुका यांनी मानले.नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार...लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद-वाळूजचे अध्यक्ष अशोक जगधने, मिडटाऊन एनएक्सचे अध्यक्ष गौरव मालाणी, औरंगाबाद मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, मेट्रोचे अध्यक्ष जयंत चौधरी, आयकॉनचे अध्यक्ष घनश्याम करणानी, जेमिनीचे अध्यक्ष विशाल झंवर, डेक्कनचे अध्यक्ष शामराव पाटील, क्लासिकचे अध्यक्ष संदीप डोडल, औरंगाबाद सिटीचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, औरंगाबाद सिडकोचे अध्यक्ष महेंद्र खानापूरकर, एन्जलच्या अध्यक्षा हिना देसाई, लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या अध्यक्षा छाया जंगले, औरंगाबाद- चिकलठाणा अध्यक्ष- सुरेश साकला आदींसह जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल व अन्य पदाधिका-यांचा सत्कार केला.

टॅग्स :Rajendra Dardaराजेंद्र दर्डाSocialसामाजिक