शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हद्द झाली ! भूमाफियांनी अस्तित्वात नसलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:44 IST

The land mafia sold the non-existent plot फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींची भेट घेतली तेव्हा आरोपींनी दुसरा भूखंड देण्याची तयारी दर्शविली.

ठळक मुद्देभूखंड विकून साडेआठ लाखांची केली फसवणूकएकाच भूखंडाचे दोन सातबारा असल्याचे झाले उघडकीस

औरंगाबाद : अस्तित्वात नसलेल्या भूखंडाचे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत करून देत भूमाफियाच्या टोळीने एकाची आठ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेने चौकशी करून गुरुवारी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. नदीम हसन शेख (रा. जयसिंगपुरा), एजंट नदीम इब्राहिम शेख (रा. रोशन गेट) आणि बादशाह ऊर्फ अय्याज खान बाबूखान (रा. बायजीपुरा) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार दत्तात्रय सुधाकर गायके (रा. मारोतीनगर) यांना बायजीपुरा येथील घर विकायचे होते. घराच्या बदल्यात प्लॉट देण्याची तयारी आरोपींनी दर्शविली. आरोपींनी गायके यांना बाळापूर शिवारातील एक हजार ५०० चौ. फू. क्षेत्रफळाचा आठ लाख ४० हजार रुपये किमतीचा भूखंड दाखविला. तक्रारदार यांच्या घराची किमत नऊ लाख रुपये निश्चित केली. यानंतर आरोपींनी तक्रारदार यांना तो भूखंड नावे करून दिला आणि तक्रारदाराकडून त्यांचे घर सिरसाट नावाच्या व्यक्तीच्या नावे करून घेतले. सिरसाटने हे घर लगेच दुसऱ्या एका व्यक्तीला आणि त्यांनी तिसऱ्याला विक्री केले. यानंतर बाळापूर सज्जाचे तलाठी शेळके यांनी तक्रारदार यांच्या रजिस्ट्री पेपरच्या आधारे त्या भूखंडाची फेर नोंदवहीत नोंद केली. यानंतर त्यांना त्यांचा सातबारा देण्यात आला. दरम्यान, ते भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांच्या भूखंडावर दुसऱ्याच व्यक्तीने हक्क सांगितला. त्याच्याकडेही सातबारा असल्याचे दिसले.

दुसरा वादग्रस्त भूखंड देण्याची तयारीफसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींची भेट घेतली तेव्हा आरोपींनी दुसरा भूखंड देण्याची तयारी दर्शविली. आरोपींनी दाखवलेले भूखंड वादग्रस्त असल्याचे समजल्याने त्यांनी त्यांचे घर परत करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत ते घर तिसऱ्याच व्यक्तीने खरेदी केल्याचे त्यांना समजले. आरोपींनी पैसेही परत केले नाहीत. यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद